पेशाने चार्टर्ड अकाउंटंट, संगीताची आवड! गणेशोत्सवानिमित्ताने गायक कपिल रौनक यांचे ‘माझा देवा’ गाणे रिलीज

गायक आणि संगीतकार कपिल रौनक (Kapil Raunak) यांनी नुकतेच गणेश उत्सव सुरू झाल्याच्या निमित्ताने ‘देवा.. माझ्यासाठी माझा देवा’ नावाचे गाणे रिलीज केले. हे गाणे कपिलचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जे त्याच्या गणपतीशी असलेल्या नात्यावर केंद्रित आहे.

पेशाने चार्टर्ड अकाउंटंट, संगीताची आवड! गणेशोत्सवानिमित्ताने गायक कपिल रौनक यांचे ‘माझा देवा’ गाणे रिलीज
Ganpati song


मुंबई : गायक आणि संगीतकार कपिल रौनक (Kapil Raunak) यांनी नुकतेच गणेश उत्सव सुरू झाल्याच्या निमित्ताने ‘देवा.. माझ्यासाठी माझा देवा’ नावाचे गाणे रिलीज केले. हे गाणे कपिलचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जे त्याच्या गणपतीशी असलेल्या नात्यावर केंद्रित आहे. हे यापूर्वी कधीही न केलेले एक अनोखे गाणे आहे, ज्यामध्ये भगवान श्रीगणेश आणि मूर्तिकार यांच्यावरील भावनांचा प्रवास आणि सर्व 11 दिवस लोकांच्या भावनांबद्दल भाष्य करण्यात आले आहे.

भावना आणि उत्सव यांचे क्लासिक मिश्रण विशेषतः जेव्हा लोक समूहात आणि गर्दीत साजरे करण्यासाठी बाहेर पडू शकत नाहीत, अशावेळी यातील दृश्ये डोळ्यांना सुखावणारी आहेत आणि ती एका मूर्तिकाराच्या कथेविषयी बोलतात, जो आपल्या जगण्यासाठी मुर्ती बनवतो आणि विकतो. या दरम्यान तो  वेदना आणि आनंद दोन्ही अनुभवतो.

प्रसाद पाष्टेंनी तयार केले संगीत

या गाण्याचे संगीत प्रख्यात चित्रपट गीत निर्माते प्रसाद साष्टे यांनी तयार केले आहे. प्रसाद पाष्टे ‘मुल्क’, ‘कलंक’ आणि आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ आणि इतर अनेक चित्रपटांमधील त्यांच्या संगीतासाठी प्रसिद्ध आहेत.  संजीव के मिश्रा यांनी या गाण्याची सहनिर्मिती केली आहे.

ऐका गाणे :

कोण आहेत कपिल रौनक?

कपिल रौनक हे चार्टर्ड अकाउंटंट आणि व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत आणि सीएमएस रेकॉर्डच्या लेबलखाली हे त्यांचे पहिले गाणे आहे. लेबल म्हणून सीएमएस रेकॉर्डमध्ये नजीकच्या भविष्यात असंख्य गाणी रिलीज करण्याची योजना आहे.  ‘देवा – माझ्यासाठी माझा देवा’ हे गाणे इंदूरमधील एका सुंदर ठिकाणी चित्रीत करण्यात आले आहे आणि गाण्यात काही वास्तविक लोकेशन्स आहेत. आपल्या परिसरातील गणेश उत्सवाचे गाणे चित्रित केल्याबद्दल स्थानिक लोक देखील अत्यंत भावुक झाले होते. हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून, या वर्षीचे गणेशोत्सव गीत गीत ठरेल, असा विश्वाशी त्यांनी व्यक्त केला आहे.

हे गाणे माझ्या हृदयाजवळचे!

गाण्याचा ऑडिओ आणि व्हिडीओ खूपच भव्य आहे, ज्यात असे कथानक आहे जे एखाद्याला भावनिक देखील करू शकते.  कपिल म्हणतो की, ‘माझा गणपतीसोबत खूप खास संबंध आहे आणि मला संगीतकार म्हणून माझी वाटचाल त्यांना या गाण्याने समर्पित करायची होती. देवा हे असे गाणे आहे जे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे आणि मला खात्री आहे की, ते प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळचे गाणे बनेल. या म्युझिक व्हिडीओमध्ये अशी काही दृश्ये आहेत, जी मूळ योजनेत नव्हती, परंतु त्या बदल्यात स्वाभाविकपणे देवाचा आशीर्वाद म्हणून आली असावीत.’

हेही वाचा :

Baap Beep Baap : वडील आणि मुलामध्ये मैत्रीचे बंध निर्माण करणारं नवं गाणं, ‘बाप बीप बाप’मधील ‘वय नाही’ प्रेक्षकांच्या भेटीला

Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्ध पुन्हा अरुंधतीकडे जाणार, संजना देशमुखांच्या घरात एकटी पडणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI