Wrap UP | अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’चे शूटिंग केले पूर्ण, पुढील वर्षी ‘या’ तारखेला रिलीज होणार चित्रपट!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) आजकाल खूप धमाल करत आहे. त्याच्याकडे नव्या प्रोजेक्ट्सची भली मोठी रांग आहे आणि तो त्याच्या आगामी चित्रपटांच्या ‘बॅक टू बॅक’ शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Wrap UP | अक्षय कुमारने 'रक्षाबंधन'चे शूटिंग केले पूर्ण, पुढील वर्षी ‘या’ तारखेला रिलीज होणार चित्रपट!
Akshay Kumar-Anand L Rai
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 1:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) आजकाल खूप धमाल करत आहे. त्याच्याकडे नव्या प्रोजेक्ट्सची भली मोठी रांग आहे आणि तो त्याच्या आगामी चित्रपटांच्या ‘बॅक टू बॅक’ शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आजकाल अक्षय त्याच्या आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. आता त्याने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ‘रक्षाबंधन’चे शूटिंग पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत पूर्ण झाले आहे. त्याने आनंद एल रायसोबत एक फोटोही शेअर केला आहे.

अक्षयने शेअर केली पोस्ट

फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले की, ‘रक्षाबंधनाच्या संपूर्ण शूटिंग दरम्यान आनंद आणि मी असेच हसत राहिलो. उद्या नसेल असे हसलो. तसे, आम्ही काल रात्री चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. दुःखाची एक कडवी छटा होती. आता दुसऱ्या ठिकाणी. नवीन दिवस, नवीन रोलर कोस्टर.’

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या वर्षी जूनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग मुंबई परिसरात एका मोठ्या सेटवर सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वी अक्षय या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चांदनी चौकातील रस्त्यावर धावतानाही दिसला होता, त्याचा हा फोटो बराच व्हायरल झाला होता. नुकत्याच मिळालेल्या माहितीवरून कळले आहे की, दिल्लीत काल रात्री टीमने शूटिंगच्या शेवटच्या दिवसासह चित्रपट अखेर पूर्ण केला आहे. भूमी पेडणेकर अभिनीत हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या वीकेंडला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

आनंद एल राय दिग्दर्शित, हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लन लिखित, या चित्रपटाची निर्मिती केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहकार्याने कलर यलो प्रॉडक्शन, झी स्टुडिओ आणि अलका हिरानंदानी यांनी केली आहे. अक्षयसोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षात हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. रक्षबंधन हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. आता त्यांचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिवाळीनिमित्त हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अक्षय ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ आणि पूजा एंटरटेनमेंटच्या एका चित्रपटात दिसणार आहे. अक्षयने आनंद एल रायसोबत ‘अतरंगी रे’मध्येही काम केले आहे.

हेही वाचा :

तिसरी घंटा पुन्हा वाजणार, नाट्यगृहे पुन्हा उघडण्याचा मुहूर्त ठरला, काय आहेत नियम?

Happy Birthday Akshara Hassan: चार वर्षांपूर्वी कमल हसनच्या कन्येचं धर्मांतर; खासगी फोटो सोशल मीडियावर लीक, वाचा अक्षरा हसनबद्दल खास गोष्टी

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.