AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sooryavanshi | अक्षय-कतरिनाच्या ‘सूर्यवंशी’वर कोरोनाची टांगती तलवार! प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार?

कोरोनाच्या या नव्या नियमांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शन लांबणीवर पडण्याची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी रिलीज होणार का?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Sooryavanshi | अक्षय-कतरिनाच्या ‘सूर्यवंशी’वर कोरोनाची टांगती तलवार! प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार?
बॉक्स ऑफिसवर अक्षय आणि कतरिनाच्या चित्रपटाचा धमाका
| Updated on: Mar 31, 2021 | 11:52 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi film) चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट मार्च 2020मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, 24 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर करताच या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. पण, आताच काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीच्या वाढदिवशी या चित्रपटाच्या टीमने 30 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले होते. परंतु, आता ज्याप्रकारे देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातही कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा परिणाम थेट चित्रपटांच्या कमाईवर पडणार आहे (Akshay Kumar starrer Sooryavanshi film release will postpone due to corona).

कोरोनाच्या या नव्या नियमांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शन लांबणीवर पडण्याची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी रिलीज होणार का?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वृत्तानुसार नाईट कर्फ्यूमुळे चित्रपटाचा नाईट शो चालवला जाऊ शकणार नाही. ज्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर या चित्रपटाचे बजेटही खूप मोठे आहे, यामुळे चित्रपटाची रिलीज ही आता लवकरात लवकर पार पाडणे गरजेचे आहे. चित्रपट लवकर प्रदर्शित झाल्यास, त्याची कमाई चांगली होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुन्हा एकदा कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता

या चित्रपटासंदर्भात निर्मात्यांमध्ये बर्‍याच चर्चा चालू आहेत. हा चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात वाढत्या कोरोना केसेसमुळे आणि नाईट कर्फ्यू योग्यप्रकारे न पाळल्यामुळे, येत्या काही दिवसांत आपण संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे (Akshay Kumar starrer Sooryavanshi film release will postpone due to corona).

दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनासाठी पूर्णपणे तयार झाले आहेत. त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच हरकत नाही. या चित्रपटात अभिनेत्री कातरिना कैफ, अभिनेता जावेद जाफरी, जॅकी श्रॉफ ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर अजय देवगन आणि रणवीर सिंगची देखील यात खास भूमिका असणार आहे.

नेटफ्लिक्सवरही होणार प्रदर्शित!

चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना नेटफ्लिक्सवरही बघायला मिळणार आहे. बातमीनुसार, हा चित्रपट 28 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. नेटफ्लिक्सने 200 कोटींचा करारा केल्याची चर्चा सुरु, पण यावर मात्र शिक्कामोर्तब झाला नाही. म्हणजेच या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वी बरीच कमाई केली आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडून मेकर्सनाही मोठ्या आशा आहेत. असं म्हणतात की, हा चित्रपट खूप चांगला गल्ला जमवू.

‘सूर्यवंशी’चे चाहते एका वर्षापासून अधीरतेने वाट पाहत होते. सूर्यवंशी व्यतिरिक्त नेटफ्लिक्सवर ‘बुलबुल तरंग’, ‘जादूगार’ ‘पगलैट’ सारख्या चित्रपटांसह अनेक उत्कृष्ट चित्रपट सादर केले जाणार आहेत. आता अक्षय कुमारच्या ज्या चाहत्यांना थिएटरमध्ये सूर्यवंशीचा आनंद घेता येणार नाही, आता त्यांना घरी बसून हा चित्रपट पाहता येईल.

(Akshay Kumar starrer Sooryavanshi film release will postpone due to corona)

हेही वाचा :

Aai Majhi Kalubai | वीणाची एक्झिट, ‘या’ अभिनेत्रीची ‘आर्या’ म्हणून एंट्री! सोशल मीडियावर शेअर केला खास लूक

Karan Johar | नेपोटीझम वाद टाळण्यासाठी करण जोहरची नवी खेळी, अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करणार सैफच्या लेकाला लाँच!

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....