AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ameesha Patel: ‘जिवाच्या भीतीने तिथून लगेच निघाले’; तक्रार दाखल झाल्यानंतर अमिषा पटेलचं स्पष्टीकरण

फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) सोशल मीडियाद्वारे तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खांडवा जिल्ह्यातील नवचंडी महोत्सव 2022 (Navchandi Mahostav 2022) मध्ये अमिषाच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार (police complaint) दाखल करण्यात आली.

Ameesha Patel: 'जिवाच्या भीतीने तिथून लगेच निघाले'; तक्रार दाखल झाल्यानंतर अमिषा पटेलचं स्पष्टीकरण
Ameesha PatelImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 27, 2022 | 10:27 AM
Share

फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) सोशल मीडियाद्वारे तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खांडवा जिल्ह्यातील नवचंडी महोत्सव 2022 (Navchandi Mahostav 2022) मध्ये अमिषाच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार (police complaint) दाखल करण्यात आली. अमिषाने एका तासाच्या हजेरीसाठी 4 लाख रुपये घेतले होते, परंतु तीन मिनिटांतच ती तिथून निघून गेली, असा आरोप करण्यात आला. यावर आता अमिषाने ट्विट करत उत्तर दिलं आहे. अमिषाने ट्विटरवर लिहिलं की ती कार्यक्रमाला उपस्थित होती पण ती इतक्या वाईट पद्धतीने आयोजित करण्यात होती की तिला तिच्या जीवाची भीती वाटत होती. ‘मध्य प्रदेशातील खांडवा शहरात काल 23 एप्रिल रोजी नवचंडी महोत्सव 2022 ला मी उपस्थित राहिले. पण स्टार फ्लॅश एंटरटेन्मेंट आणि अरविंद पांडे यांनी आयोजित केलेल्या या नवचंडी महोस्तवात मला माझ्या जिवाची भीती वाटत होती. अत्यंत वाईट पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र माझ्या सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल मी स्थानिक पोलिसांचे आभार मानते,’ असं तिने लिहिलं.

मोघाट पोलिस स्टेशनचे प्रभारी ईश्वर सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं की, “अभिनेत्री अमिषा पटेलच्या कार्यक्रमाच्या दिवशी मीसुद्धा तिथे होतो. लोकांची गर्दी नक्कीच होती पण कुठेच असभ्यता नव्हती. घटनास्थळी काही घडल्याचीही माहिती आम्हाला मिळाली नाही.”

तक्रारीनंतर अमिषाने एक निवेदन जारी केलं. ज्यामध्ये असं लिहिलं की, “माझ्याविरोधात फसवणुकीची तक्रार केल्याबद्दल मी स्पष्ट करू इच्छिते की मी 23 एप्रिल 2022 रोजी मध्य प्रदेशातील नवचंडी महोत्सवात सहभागी झाले होते. स्टार फ्लॅश एंटरटेन्मेंट आणि अरविंद पांडे यांनी इतक्या वाईट पद्धतीने आयोजन केलं होतं की मला माझ्या जिवाची भीती वाटत होती. मला त्या कार्यक्रमात परफॉर्म करायचं नव्हतं. तिथे फक्त मला हजर राहायचं होतं आणि मी हजर राहिले. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा मला जाणवलं की आयोजकांचा व्यवहार चांगला नाही आणि मला ते ठीक वाटत नव्हतं. मला तिथून सुरक्षितपणे निघून जाण्यास मदत करणाऱ्या स्थानिक पोलिसांची मी आभारी आहे. अशा घटनांमुळे माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, पण मला याचं समाधान आहे की या जगात चांगली माणसंसुद्धा आहेत.”

अमिषा अशा प्रकारच्या कायदेशीर अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये चित्रपट निर्माता अजय कुमार सिंग यांनी तिच्यावर 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तिच्या ‘देसी मॅजिक’ चित्रपटासाठी तिने पैसे उधार घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी अमिषाविरोधात रांची इथल्या न्यायालयात धाव घेतली होती.

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप