Happy Anniversary | वडिलांची एक अट अन् त्याच दिवशी पार पडले अमिताभ-जया बच्चन यांचे लग्न!

बॉलिवूडची लोकप्रिय आणि लाडकी जोडी अर्थात ‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) आज (3 जून) आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी 1973मध्ये या दोघांचे लग्न पार पडले होते.

Happy Anniversary | वडिलांची एक अट अन् त्याच दिवशी पार पडले अमिताभ-जया बच्चन यांचे लग्न!
अमिताभ आणि जया बच्चन
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 11:56 AM

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय आणि लाडकी जोडी अर्थात ‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) आज (3 जून) आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी 1973मध्ये या दोघांचे लग्न पार पडले होते. आजही दोघे पूर्वीप्रमाणेच एकमेकांवर प्रेम करतात. या व्यतिरिक्त, प्रत्येक कठीण परिस्थितीत हे दोघेही एकमेकांना पूर्ण पाठींबा देतात. प्रत्येक वेळी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बिग बी सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करतात आणि यावेळीसुद्धा त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. आजच्या या खास दिवशी बिग बींनी आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत (Amitabh and Jaya Bachchan marriage anniversary special story know about their love story).

दोघांच्या लग्नाच्या फेऱ्यांदरम्यानचे हे फोटो आहेत. यात जया बच्चन यांनी लाल रंगाचे पारंपारिक कपडे परिधान केले आहे आणि बिग बींनी ऑफ-व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली होती. फोटो शेअर करताना ‘बिग बीं’नी लिहिले की, ‘3 जून, 1973, लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या प्रार्थना आणि अभिनंदनाबद्दल धन्यवाद…’

पाहा अमिताभ बच्चन यांची पोस्ट

असे जुळते सूत

‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जया भादुरी आणि राजेश खन्ना एकत्र काम करत असलेल्या ‘बावर्ची’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ सतत जया यांना भेटायला जात असत आणि त्यामुळे दोघांचे प्रेम आणखी वाढत गेले (Amitabh and Jaya Bachchan marriage anniversary special story know about their love story).

हरिवंशराय बच्चन यांची अट

मात्र, अमिताभ आणि जया यांचे लग्न अचानक झाले होते. ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते, जया देखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र, वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावे लागले.

खरं तर, लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जया देखील आहेत, हे जेव्हा हरिवंश राय बच्चन यांना समजले तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचे असेल तर, दोघांनाही आधी लग्न करावे लागेल. याच कारणास्तव, दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी 3 जून 1973 रोजी एका साध्या घरगुती सोहळ्यात लग्न केले आणि त्याच दिवशी दोघे हनिमूनसाठी थेट लंडनला रवाना झाले होते.

बिग बी आणि जया बच्चन यांनी ‘बंसी बिरजू’, ‘एक नजर’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘चुपके-चुपके’, ‘शोले’, ‘सिलसिला’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

(Amitabh and Jaya Bachchan marriage anniversary special story know about their love story)

हेही वाचा :

इथे रियुनियन, तिथे ब्रेकअप, FRIENDS फेम 51 वर्षीय मॅथ्यू पेरीचे तिशीतील गर्लफ्रेण्डसोबत ब्रेकअप

विराट-अनुष्काची लेक पुन्हा पापाराझींच्या कॅमेरात कैद, सोशल मीडियावर ‘वामिका’ची झलक चर्चेत!

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.