विराट-अनुष्काची लेक पुन्हा पापाराझींच्या कॅमेरात कैद, सोशल मीडियावर ‘वामिका’ची झलक चर्चेत!

मुलीच्या जन्मानंतरच विराट आणि अनुष्काने सर्व माध्यमातील व्यक्ती आणि कॅमेरामन इत्यादींना पत्र पाठवले होते की, त्यांनी आपल्या मुलीचे फोटो क्लिक करू नयेत. ते आपल्याला मुलीला मीडियावर समोर आणू इच्छित नाहीत. परंतु, यानंतरही सतत वामिकाचे फोटो क्लिक केले जात आहेत.

विराट-अनुष्काची लेक पुन्हा पापाराझींच्या कॅमेरात कैद, सोशल मीडियावर ‘वामिका’ची झलक चर्चेत!
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. अभिनेत्री जरी चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संपर्कात आहे. याच वर्षी अनुष्काने एका मुलीला जन्म दिला. पण, अनुष्काने आपल्या मुलीला मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवले आहे. अभिनेत्रीने आपल्या मुलीचे कोणताही फोटो अद्याप शेअर केलेला नाही. अनुष्काला आपल्या मुलीला सध्या मीडियापासून दूरच ठेवायचे आहे. पण, आता पुन्हा विराट-अनुष्काच्या लेकीचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले आहेत (Virat Kohli and Anushka Sharma daughter Vamika captured by media cameras).

अनुष्का शर्माने आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ (Vamika) ठेवले आहे. आता अलीकडेच अनुष्का आपल्या लेकीसोबत विमानतळावर दिसली होती. यावेळी नवरा विराटही (Virat Kohli) तिच्यासोबत दिसला. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा वामिकाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

नकार देऊनही काढले जात आहेत फोटो

11 जानेवारीला अनुष्का आई झाली. परंतु, मुलीच्या जन्मानंतरच विराट आणि अनुष्काने सर्व माध्यमातील व्यक्ती आणि कॅमेरामन इत्यादींना पत्र पाठवले होते की, त्यांनी आपल्या मुलीचे फोटो क्लिक करू नयेत. ते आपल्याला मुलीला मीडियावर समोर आणू इच्छित नाहीत. परंतु, यानंतरही सतत वामिकाचे फोटो क्लिक केले जात आहेत.

अलीकडेच भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. त्यामुळे अनुष्कादेखील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत इंग्लंडला रवाना झाली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा अनुष्का आपल्या पतीसमवेत बसमधून खाली उतरली, तेव्हा तिच्या मुलीचे फोटो क्लिक केले गेले. फोटोमध्ये वामिकाचा चेहरा किंचितसा  दिसत आहे. अनुष्काने आपल्या मुलीला ज्या पद्धतीने कवेत घेतले आहे, त्यावरून तिला आपल्या मुलीला मीडियापासून किती दूर ठेवायचे आहे, हे स्पष्ट होते (Virat Kohli and Anushka Sharma daughter Vamika captured by media cameras).

पाहा वामिकाची झलक :

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

दरम्यान वामिकाचे फोटो क्लिक केल्यामुळे काही चाहते संतप्त झाले आहेत, तर काहीजण तिची एक झलक पाहायला मिळाल्यामुळे खूष झाले आहेत.

विराटने सांगितलं मुलीला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचं कारण

अलीकडेच ‘आक्स मी एनिथिंग’ या सेशनमध्ये विराटने चाहत्यांच्या प्रश्नांना अगदी दिलखुलास उत्तरं दिली. या दरम्यान एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, ‘वामिका हे देवी दुर्गाचं दुसरं नाव आहे. आम्ही नवरा बायकोने ठरवलंय (विराट-अनुष्का) की आपल्या लेकीचा फोटो आपण सोशल मीडियावर शेअर करायचा नाही. जोपर्यंत तिला सोशल मीडिया म्हणजे काय? हे समजत नाही तोपर्यंत तिचा चेहरा, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा नाही. यासंदर्भात ती (वामिका) तिचा निर्णय घेईल.’

(Virat Kohli and Anushka Sharma daughter Vamika captured by media cameras)

हेही वाचा :

Happy Birthday Sarika | दोन्ही मुलींच्या जन्मानंतर बांधली लग्नगाठ, वाचा सारिका-कमल हसनच्या प्रेमकथेबद्दल..  

सोहेल खानने ओलांडल्या धर्माच्या भिंती, सीमाशी आधी मंदिरात लग्न, मग पुन्हा निकाह

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI