AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anupam Kher: “भूतकाळ तुम्हाला नक्कीच त्रास देईल”; ‘लाल सिंग चड्ढा’च्या बॉयकॉट ट्रेंडवरून अनुपम खेर यांची आमिरवर टीका

आमिरने याआधी देशाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी काही नेटकरी करत आहेत. आता यावरून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनीसुद्धा आमिर खानवर टीका केली आहे.

Anupam Kher: भूतकाळ तुम्हाला नक्कीच त्रास देईल; 'लाल सिंग चड्ढा'च्या बॉयकॉट ट्रेंडवरून  अनुपम खेर यांची आमिरवर टीका
Anupam Kher and Aamir KhanImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 11:02 AM
Share

सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंडचा फटका आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला चांगलाच बसला आहे. आमिरने याआधी देशाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी काही नेटकरी करत आहेत. आता यावरून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनीसुद्धा आमिर खानवर टीका केली आहे. बॉयकॉट ट्रेंडवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अनुपम खेर म्हणाले की, ट्विटरवरील प्रत्येकाला कधीही नवीन ट्रेंड सुरू करण्याचा अधिकार आहे. आमिर खानने 2015 मध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. “भारत हा देश खूप सहिष्णू देश आहे, पण काही लोक इथं असहिष्णुता पसरवण्याचं काम करत आहेत”, असं तो म्हणाला होता. त्याच्या या जुन्या विधानामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्स त्याला देशद्रोही म्हणत आहेत.

आमिरच्या या टिप्पणीवर बोलताना ‘इंडिया टुडे’च्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, “जर तुम्ही भूतकाळात काही म्हणाला असाल, तर त्याचा त्रास नक्कीच तुम्हाला भोगावा लागेल. जर एखाद्याला वाटत असेल की त्याने ट्रेंड सुरू करावा तर तसं करण्यास ते मुक्त आहेत. ट्विटरवर दररोज नवीन ट्रेंड येत असतात.”

अनुपम खेर आणि आमिर खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. दिल, दिल है के मानता नहीं यांसारख्या चित्रपटांनी दोघांनी स्क्रीन शेअर केले होते. 2015 मध्ये, अनुपम खेर हे अशा अनेक व्यक्तींपैकी एक होते ज्यांनी आमिरला त्याच्या वक्तव्यासाठी फटकारलं होतं. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, “तुम्ही किरणला (राव) विचारलं होतं का की तिला कोणत्या देशात जायला आवडेल? या देशाने तुला आमिर खान बनवलं आहे, असं तू तिला सांगितलंस का?” दरम्यान लाल सिंग चड्ढा व्यतिरिक्त इतर अनेक चित्रपट बहिष्काराच्या ट्रेंडचे लक्ष्य बनले आहेत. यामध्ये अक्षय कुमारचा रक्षाबंधन, विजय देवरकोंडाचा लायगर आणि शाहरुख खानचा आगामी पठाण यांचा समावेश आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.