अनुराग, तापसीच्या अडचणी वाढणार; दोन दिवसांपासून चौकशी सुरुच, मोठे खुलासे होण्याची शक्यता?

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे सध्या पुण्यातील वाकड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. (anurag kashyap taapsee pannu pune income tax department)

  • अश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 9:59 AM, 5 Mar 2021
अनुराग, तापसीच्या अडचणी वाढणार; दोन दिवसांपासून चौकशी सुरुच, मोठे खुलासे होण्याची शक्यता?

पुणे : सोशल मीडियातून रोखटोक भूमिका मांडणारी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्या मालवत्तांवर आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरु असून त्यांनी कित्येक कोटींचा कर बुडवल्याचे बोलले जात आहे. मिलालेल्या ताज्या माहितीनुसार अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे सध्या पुण्यातील वाकड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. मागील दोन दिवसांपासूनत त्यांची चौकशी सुरु असून आयकर विभागाची टीमदेखील याच हॉटेलमध्ये आहे. (Anurag Kashyap and Taapsee Pannu stayed in Pune Wakad five star hotel inquiry still going on by Income Tax Department)

मागील दोन दिवसांपासून चौकशी सुरु 

करचोरी केल्याप्रकरणी अनुराग आणि तापसी यांच्या मालमत्तांवर छापेमारी झाल्यानंतर देशात खळबळ उडाली. केंद्र सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप यावेळी अनेकांनी केला. मात्र, तापसी आणि अनुराग यांच्या आर्थिक व्यवहरात अनेक अफरातफरी आढळल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे मागील दोन दिवसांपासून तापसी आणि अनुराग हे पुण्यातील वाकड या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून आहेत. तसचे या प्रकरणी तपास करणारी आयकर विभागाची टीमसुद्धा याच हॉटेलमध्ये आहे. अनुराग आणि तापसी यांची आयकर विभागाच्या दोन पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून ही चौकशी सुरु आहे.

अनेक अफरातफरी, कोटींचा कर चुकवण्याचा संशय

दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्याची निगडित असलेल्या एकूण 28 मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर आयकर विभागाला त्यांच्या आर्थिक व्यवहरात काही विसंगती आढळल्याचे सांगण्यात येत आहे. आयकर विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथे सर्च ऑपरेशन केलं. अनुराग आणि तापसीचं घर आणि ऑफिसेस मिळून तब्बल 28 ठिकाणी छापे टाकले गेले. सर्च ऑपरेशन दरम्यान इनकम आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. इनकम टॅक्स विभागाला 350 कोटी रुपयांची टॅक्स चोरीची शंका आहे. तसेच तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटी रुपयांची रिसिट रिकव्हर झाली. ज्याची तपासणी सुरु आहे. याशिवाय 20 कोटींच्या टॅक्सचोरीसंबंधी पुरावे मिळाले आहेत.

इतर बातम्या :

मोदी सरकारचा विरोध महागात पडतोय अनुराग कश्यपला की खरोखरच टॅक्स चोरी? वाचा सविस्तर

कंगनाशी पंगा, मोदी सरकारविरोधी भूमिका, तापसीच्या धाडीचं राजकीय कनेक्शन? किती कमाई? वाचा सविस्तर

कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका, ‘त्या’ जाहिरातीवरून सुनावले बोल

(Anurag Kashyap and Taapsee Pannu stayed in Pune Wakad five star hotel inquiry still going on by Income Tax Department)