कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका, ‘त्या’ जाहिरातीवरून सुनावले बोल

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात नेहमीच अडकते

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:25 PM, 3 Mar 2021
कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका, 'त्या' जाहिरातीवरून सुनावले बोल

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात नेहमीच अडकते. मात्र, असे असताना देखील कंगना प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करतेच. नुकताच कंगनाने एक ट्विट करत आता आपला मोर्चा अभिनेत्री दीपिका पादुकोनकडे (Deepika Padukone)वळवला आहे. (Kangana Ranaut tweeted targeting Deepika Padukone)

कंगना रनौतने केलेले ट्विट 

दीपिकाने काही दिवसांपूर्वी अमेरिकन जीन्सच्या कंपनीची एक जाहिरात केली आहे आणि ती जाहिरात वादामध्ये अडकली आहे. यावरूनच कंगनाने दीपिकाच्याविरोधात एक ट्विट केलं आहे.  कंगनाने ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, त्या महिलांचे कौतुक करण्याचे ट्विट ज्यांनी केवळ त्यांचे व्यक्तिमत्त्व दर्शविले नाही तर संपूर्ण सभ्यता, संस्कृती आणि राष्ट्रांसाठी काम केले आहे.

आणि आज  तुम्ही फाटलेल्या अमेरिकन जीन्स घालून अमेरिकन मार्केटिंगचे प्रतिनिधित्व करीत आहात. दीपिकाच्या या जाहिरातीवर सूनी तारापुरवालाचा चित्रपट ‘ये बैले’ची कॉपी केली असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर सूनी यांनी अमेरिकन जाहिरात कंपनीला बऱ्याच गोष्टी सुनावल्या. जाहिरात कंपनीने देखील आपली चुक कबुल करू सांगितले आहे की, ही जाहिरात आम्ही ये बैले चित्रपटाला प्रेरित होऊनच तयार केली आहे. आता प्रकरणावर कंगनाने दीपिकावर निशाना साधला आहे.

संबंधित बातम्या : 

Video : श्रद्धा कपूरचे बर्थडे सेलिब्रेशन थेट मालदीवमध्ये, पाहा खास व्हिडीओ

शेतकरी आंदोलनाला बॉलिवूडचा पाठिंबा? किसान आंदोलनावर बनणार चित्रपट

सुनील शेट्टीचा मुलगा अहानच्या ‘तडप’ चित्रपटाचे पोस्टर शेअर, अक्षय कुमार म्हणतो…

(Kangana Ranaut tweeted targeting Deepika Padukone)