शेतकरी आंदोलनाला बॉलिवूडचा पाठिंबा? किसान आंदोलनावर बनणार चित्रपट

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा (Rakeysh Omprakash Mehra) लवकरच शेतकऱ्यांवर आधारित एक चित्रपट तयार करणार आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:57 AM, 3 Mar 2021
शेतकरी आंदोलनाला बॉलिवूडचा पाठिंबा? किसान आंदोलनावर बनणार चित्रपट

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा (Rakeysh Omprakash Mehra) लवकरच शेतकऱ्यांवर आधारित एक चित्रपट तयार करणार आहेत. ‘दिल्ली 6’ आणि ‘रंग दे बसंती’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन राकेश यांनी केले आहे. बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट तयार करण्यासाठी राकेश यांची ओळख आहे. शेतकऱ्यांवर आधारित चित्रपटाचे लेखक कमलेश पांडे आहेत. (Bollywood’s support for farmers’ movement? A film will be made on the peasant movement)

एका मुलाखती दरम्यान कमलेश पांडे यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. यासह त्यांनी सांगितले की, या चित्रपटावर बऱ्याच दिवसांपासून काम सुरू आहे. कमलेश म्हणाले की, या चित्रपटाची मुळ कथा शेतकऱ्यांवर आधारित आहे त्यामध्ये दाखवण्यात येणार आहे की, शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत दररोज त्यांना कुढल्या परिस्थितीला सामोरे जावे लागते.

आम्ही या चित्रपटावर गेल्या चार वर्षांपासून काम करत आहोत आणि देशात शेतकरी आंदोलन सुरू आहे. जर चित्रपटाच्या निर्मात्याने ठरवले तर आम्ही दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देखील यामध्ये जोडू शकतो. जर असे झाले तर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर हा चित्रपट तयार होऊ शकतो.

मात्र, अद्याप या चित्रपटाचे नाव घोषित करण्यात आले नाही आणि आताच्या परिस्थितीमध्ये हा चित्रपट तयार झाल्यावर तो चित्रपट सुपरहिट होऊ शकतो असा अंदाज आहे. मिळालेल्या एका रिपोर्टनुसार या चित्रपटात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दाखवण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

सुनील शेट्टीचा मुलगा अहानच्या ‘तडप’ चित्रपटाचे पोस्टर शेअर, अक्षय कुमार म्हणतो…

अजय देवगणची गाडी रोखणाऱ्या तरुणाला जामीन, काय आहे प्रकरण

ट्रोल करणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांना अंकिता लोखंडेचे उत्तर, पाहा व्हिडीओ

(Bollywood’s support for farmers’ movement? A film will be made on the peasant movement)