Breaking News | बॉलिवूडवर इन्कम टॅक्सची धाड, तापसी पन्नू-अनुराग कश्यपसह अनेक बड्या कलाकारांवर कारवाई!

आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने (Income tax raid) आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्याचं दिसत आहे. कारण इन्कम टॅक्सने मुंबईत अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:04 PM, 3 Mar 2021
Breaking News | बॉलिवूडवर इन्कम टॅक्सची धाड, तापसी पन्नू-अनुराग कश्यपसह अनेक बड्या कलाकारांवर कारवाई!

मुंबई : आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने (Income tax raid) आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्याचं दिसत आहे. कारण इन्कम टॅक्सने मुंबईत अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू (Taapasee Pannu), दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे (Income tax raid on Bollywood celebrities including taapasee pannu and anurag kashyap).

(Income tax raid on Bollywood celebrities including taapasee pannu and anurag kashyap).

मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांवर 2015 मध्ये आलेल्या फँटम (Phantom) या सिनेमाशी संबंधित व्यवहारावरुन धाडी पडल्या आहेत. अनुराग कश्यप, विकास बहल आणि तापसी पन्नू यांच्या घरांची आयकर अधिकारी झाडाझडती करत आहेत. या कलाकारांनी आयकर चोरी केल्याचा संशय आहे आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयकर विभागाकडून होत आहे.

‘क्वान’ पुन्हा अडचणीत

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मंटेना यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. मधु मंटेनाची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयातही प्राप्तिकर अधिकारी पोहोचले आहेत. या छापामागील कारण अद्याप समोर आले नाही.

इन्कम टॅक्स चोरीचा आरोप!

या धाडीत जी नावे समोर आली आहेत, ती सध्या अनुराग कश्यपच्या कंपूकडे लक्ष वेधत आहेत. याक्षणी अधिक माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे. अभिनेता विकास बहल देखील पूर्वी अनुराग कश्यपच्या कंपनीचा एक भाग होता. नंतर अनुरागने त्याला या कंपनीतून दूर केले. एका मॉडेलने # मीटूमध्ये विकास बहलवरही आरोप केले होते. त्यानंतर अनुराग कश्यप यांनी विकासला त्याच्या प्रोडक्शन हाऊस ‘फॅंटम फिल्म्स’मधून काढून टाकले होते.

या कलाकारांवर इन्कम टॅक्स चोरीचे मोठे आरोप असल्याचे सांगण्यात येत आहे. या छाप्यात आयकर विभागाला काय मिळाले, ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल (IT Raids on Bollywood celebrities actor taapsee pannu and film director anurag kashyap Income tax raid News today Mumbai).

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हीच्याकडे सध्या चित्रपटांची रंग आहे. ती लवकरच ‘लूट लपेटा’मध्ये दिसणार आहे. तापसीने ‘लूट लपेटा’मधील आपला पहिला लूक शेअर केला आहे. तिच्या या पात्राचे नाव ‘सावी’ आहे. यापूर्वी अनुराग कश्यप समवेत अभिनेत्री तापसी पन्नूने ‘मनमर्जिया’ नावाचा चित्रपट केला आहे. ती या काळात टाईम ट्रॅव्हलवर आधारित दुसर्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

(Income tax raid on Bollywood celebrities including taapasee pannu and anurag kashyap)

हेही वाचा :

ट्विटरवर ‘अजय देवगन कायर है’ ट्रेंड, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण

कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका, ‘त्या’ जाहिरातीवरून सुनावले बोल