ट्विटरवर ‘अजय देवगन कायर है’ ट्रेंड, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) सध्या चर्चेत आला आहे.

ट्विटरवर ‘अजय देवगन कायर है’ ट्रेंड, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 1:07 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) सध्या चर्चेत आला आहे. अजय मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना एका व्यक्तीने अजयची गाडी अडवून शेतकरी आंदोलनावर भाष्य करण्याची विनंती अजयला केली. मात्र, यासर्व प्रकरणानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. आता त्याला जामीन देखील मिळाला आहे. मात्र, यासर्व प्रकरणानंतर आता ट्विटरवर #अजय_देवगन_कायर_है हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे. (Ajay Devgan is a coward’ trend on Twitter)

फेब्रुवारीमध्ये शेतकरी आंदोलनावर देशभर चर्चा सुरू होती, तेव्हा अजय देवगन यांनी या आंदोलनावर एक ट्विट करत म्हटंले होते की, हा खोटा प्रचार सुरू आहे. मात्र, त्या व्यक्तीने अजयची गाडी थांबून फक्त म्हटंले होते की, शेतकरी आंदोलनावर तुम्ही काहीतरी बोला आणि अजयची गाडी अडवल्यामुळे त्याला पोलिसांनी अटकही केली होती. मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोशल मीडियावर या व्यक्तीला सोडल्याची माहिती दिली आहे.

राजदीप सिंहच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आंदोलनाला शंभरहून अधिक दिवस झाले तरी अजयने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणतंही मत व्यक्त केलं नाही म्हणून त्याने अजयची गाडी अडवून विचारण्याचा प्रयत्न केला.राजदीपने 15 ते 20 मिनिटे अजयची गाडी अडवून ठेवल्याचं समोर आले आहे.

अजय देवगणने सोशल मीडियावर संजय लीला भन्साळीसोबत एक फोटो शेअर करत लिहिले होते की, दोन दशकांनंतर संजयच्या सेटवर खूप चांगले वाटत आहे. 1999 चा सुपरहिट चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर तब्बल 22 वर्षांनी अजय देवगण आणि संजय लीला भन्साळीसोबत काम करत आहेत. या चित्रपटात अजय देवगनसोबत सलमान खान आणि ऐश्वर्या राॅय मुख्य भूमिकेत होते.

संबंधित बातम्या : 

कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका, ‘त्या’ जाहिरातीवरून सुनावले बोल

Video : श्रद्धा कपूरचे बर्थडे सेलिब्रेशन थेट मालदीवमध्ये, पाहा खास व्हिडीओ

शेतकरी आंदोलनाला बॉलिवूडचा पाठिंबा? किसान आंदोलनावर बनणार चित्रपट

(Ajay Devgan is a coward’ trend on Twitter)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.