मोदी सरकारचा विरोध महागात पडतोय अनुराग कश्यपला की खरोखरच टॅक्स चोरी? वाचा सविस्तर

काही महिन्यांपूर्वी अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींवर टीका करत, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही बोचरी टीका केली होती. इतकेच नव्हेतर अनुराग नेहमीच त्याच्या अशाच तिखट वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. कंगनालाही त्याने असेच खडे बोल सुनावले होते.

मोदी सरकारचा विरोध महागात पडतोय अनुराग कश्यपला की खरोखरच टॅक्स चोरी? वाचा सविस्तर
सोशल मीडियातून रोखटोक भूमिका मांडणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मालवत्तांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 2:31 PM

मुंबई : आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने (Income tax raid) आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्याचं दिसत आहे. कारण इन्कम टॅक्सने मुंबईत अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू (Taapasee Pannu), दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, यात अनुरागच्या कंपूकडे लक्ष वेधले जात आहे. यामुळे अनुराग कश्यपला मोदी सरकारला केलेला विरोध आता महागात पडतोय का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे (Anurag Kashyap net worth total income and clashes details).

काही महिन्यांपूर्वी अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींवर टीका करत, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही बोचरी टीका केली होती. इतकेच नव्हेतर अनुराग नेहमीच त्याच्या अशाच तिखट वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. कंगनालाही त्याने असेच खडे बोल सुनावले होते.

अनुरागची पंतप्रधान मोदींवर टीका

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात 2019मध्ये देशभरात आंदोलनाचे सत्र सुरु होते. कुठे दगडफेक, तर कुठे जाळपोळ होत होती. तर, त्याविरोधात अनेक ठिकाणी शांततेतही मोर्चे निघाले होते. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील चर्चित सिनेनिर्माता अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता.  अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींनी मुका आणि बहिरा, असे संबोधले होते. अनुराग कश्यपने ट्विट करुन मोदींवर तिखट टीका केली होती.

अनुराग कश्यप काय म्हणाला?

‘आमचा प्रधानसेवक, आमचा पंतप्रधान, जनतेचा प्रधान नोकर नरेंद्र मोदी बहिरे, मुके आणि भावनाशून्य आहेत. ते केवळ एक नाटकी आहेत, जे भाषण देऊ शकतात. अन्य काही त्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. त्यांना ना दिसतंय, ना ऐकू येतंय. ते आता नव नवा खोटापणा शिकण्यात व्यस्त आहेत, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं होतं.

यापूर्वीही त्यांनी आरोप केला होता की, सरकार समर्थक दंगे सुरु करतात आणि त्यानंतर जनतेवर पोलीस तुटून पडतात. देशातील सद्यस्थितीला भाजप सरकार जबाबदार असून, चिघळलेल्या परिस्थितीमागे भाजपचाच हात आहे, असाही आरोप अनुराग कश्यपने केला होता (Anurag Kashyap net worth total income and clashes details).

(Anurag Kashyap net worth total income and clashes details)

कंगनाशीही पंगा!

एकेकाळी खूप जवळची मैत्रीण असणाऱ्या कंगना रनौतवर देखील अनुरागने सडकून टीका केली होती. ‘कंगना दिग्दर्शकांना शिविगाळ करते. एडिटरजवळ बसून आपल्या सहकलाकारांच्या चित्रपटातील भूमिका कापते. तिच्या या वागणुकीमुळे एकेकाळी तिचं कौतुक करणारे दिग्दर्शकही आज तिच्यापासून लांब पळतात. दुसऱ्यांना दडपून टाकण्याची किंवा दबाव टाकण्याची ताकद आपण कमावली, असं कंगनाला वाटत असेल. याशिवाय कंगनाचे जवळचे तिच्या वागणुकीचा आरसा तिला न दाखवून आणि डोक्यावर चढवून तिचंच नुकसान करत आहेत’, असं अनुराग कश्यप म्हणाला होता.

अनुरागच्या ‘फँटम फिल्म्स’बद्दल…

‘फँटम फिल्म्स’ ही एक खासगी एंटरटेन्मेंट कंपनी आहे, जिची स्थापना 2010मध्ये झाली होती. अनुराग कश्यप, विकास बहल, विक्रमादित्य मोटवानी आणि मधु मंटेना हे या कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी चित्रपट निर्मिती आणि वितरणासाठी काम करते. आता अनुराग कश्यप या कंपनीचा मालक आहे. मार्च 2015मध्ये रिलायन्स एंटरटेन्मेंटने त्यात 50 टक्के हिस्सा खरेदी केला. 2018मध्ये विकास बहल याला या कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता. त्यानंतर हे प्रोडक्शन हाऊस बंद झाले होते. सर्वांनी जाहीर केले की, हे सर्व चित्रपट निर्माते आता स्वतंत्रपणे आपले चित्रपट बनवतील. मात्र, अनुरागने पुन्हा ‘फँटम फिल्म्स’ सुरु केली.

अनुरागची कमाई

अनुरागचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिस चांगली कमाई करतात. अनुराग कश्यपची एकूण संपत्ती 110 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 806 कोटी रुपये आहे. यात चित्रपट, वैयक्तिक गुंतवणूक आणि त्याचे प्रॉडक्शन हाऊस यांच्याकडून मिळणाऱ्या मोबदल्याचा समावेश आहे. तेलंगाना, हैदराबादमध्ये त्याचे सुंदर डिझायनर लक्झरी घरे देखील आहेत. या घराचे अंदाजित मूल्य सुमारे 6 कोटी रुपये आहे. या शिवाय त्याच्याकडे वेगवेगळ्या देशांमधील संपत्ती आणि मालमत्ता देखील आहेत.

(Anurag Kashyap net worth total income and clashes details)

हेही वाचा :

Breaking News | बॉलिवूडवर इन्कम टॅक्सची धाड, तापसी पन्नू-अनुराग कश्यपसह अनेक बड्या कलाकारांवर कारवाई!

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.