Malaika Arjun: रणबीर-आलियानंतर आता अर्जुन-मलायका लग्नबंधनात अडकणार? मलायकाची सूचक प्रतिक्रिया

मलायका (Malaika) ही 48 वर्षांची असून अर्जुन हा 36 वर्षांचा आहे. या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत असून आता माध्यमांसमोरही ते याविषयी मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतात.

Malaika Arjun: रणबीर-आलियानंतर आता अर्जुन-मलायका लग्नबंधनात अडकणार? मलायकाची सूचक प्रतिक्रिया
Malaika ArjunImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 4:36 PM

बॉलिवूडमधल्या सर्वांत चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora). सुरुवातीला या दोघांनी रिलेशनशिपबद्दल मोकळेपणाने बोलणं टाळलं. मात्र आता सोशल मीडिया असो किंवा मग सार्वजनिक ठिकाणी.. मलायका आणि अर्जुन बिनधास्तपणे एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. याआधीही अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाविषयीच्या चर्चा चाहत्यांमध्ये होत्या. मात्र रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नानंतर पुन्हा एकदा अर्जुन-मलायकाला लग्नाविषयी विचारणा केली जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने याविषयी उत्तर दिलं आहे. अर्जुनवरील प्रेम, लग्न आणि रिलेशनशिपचं भविष्य यांविषयी ती या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. (Arjun Malaika Wedding)

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “प्रत्येक नात्याची एक ठराविक प्रक्रिया असते, पुढे काय आणि कुठपर्यंत याच्या योजना असतात. आपल्याला एकत्र भविष्य हवं आहे हे माहित असणं हा नात्यातला सर्वांत आवश्यक भाग असतो. जर तुम्ही अशा रिलेशनशिपमध्ये असाल जिथे तुम्ही अजूनही गोष्टी शोधत असाल आणि म्हणत असाल, ‘अरे, मला माहित नाही..’ तर अशाप्रकारच्या नात्यात मी नाही. ते माझ्यासाठी पवित्र आणि महत्त्वाचं आहे. मला असं वाटतंय की आम्ही आता अशा टप्प्यावर आहोत जिथे आम्ही नात्याच्या भविष्याचा विचार करतोय. आम्ही गोष्टींवर खूप चर्चा करतो. याबाबतीत दोघांचेही विचार आणि कल्पना सारखेच आहेत.”

हे सुद्धा वाचा

“आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. आम्ही सध्या अशा टप्प्यावर आहोत की जिथे अजूनही एकमेकांबद्दल जाणून घ्यायचंय पण आम्हाला एकमेकांसोबत एकत्र भविष्यसुद्धा पहायचंय. हे नातं पुढे कसं नेऊ शकतो हे पहायचंय. आम्ही त्या विषयावर हसतो आणि मस्करी करतो. पण त्याबाबतीत आम्ही खूप गंभीरसुद्धा आहोत. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला सकारात्मक आणि सुरक्षित वाटणं खूप गरजेचं असतं. मी खूप खूश आणि सकारात्मक आहे”, असं ती पुढे म्हणाली.

इन्स्टा पोस्ट-

यावेळी मलायका अर्जुनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. “अर्जुनकडून मला आत्मविश्वास आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी मिळतात. त्यालाही मी ते देण्याचा प्रयत्न करते. पण सर्वच गोष्टी एकदाच घडाव्यात असं मला वाटत नाही. आम्हाला अजूनही येणाऱ्या प्रत्येक दिवशी आमचं जीवन आणि रोमान्स आवडतोय. मी त्याला नेहमी सांगते की मला तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. बाकीच्या गोष्टींचं उत्तर आम्ही नक्कीच शोधून काढू, पण मला माहित आहे की तो माझ्यासाठीच आहे”, असं तिने सांगितलं.

मलायका ही 48 वर्षांची असून अर्जुन हा 36 वर्षांचा आहे. या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत असून आता माध्यमांसमोरही ते याविषयी मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतात. मात्र सुरुवातीला या दोघांनी हे नातं सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न केला होता. अखेर 2019 मध्ये अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.