Video | आयुष्मान खुराना आणि टायगर श्रॉफ यांच्यामध्ये ‘या’ कारणामुळे वाद

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Nov 29, 2022 | 7:51 PM

अत्यंत कमी वर्षामध्ये आयुष्मान खुराना याने एक वेगळी ओळख निर्माण केलीये. आयुष्मान खुरानाचा सर्व प्रवास जवळपास सर्वांनीच बघितला आहे.

Video | आयुष्मान खुराना आणि टायगर श्रॉफ यांच्यामध्ये 'या' कारणामुळे वाद

मुंबई : आयुष्मान खुराना आणि टायगर श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे हिरोपती बनताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आयुष्मान खुराना याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा व्हिडीओ असून लवकरच आयुष्मान खुरानाचा अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आयुष्मान जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. 2022 हे वर्ष आयुष्मान खुरानासाठी अजिबातच लकी ठरले नाहीये.

अत्यंत कमी वर्षामध्ये आयुष्मान खुराना याने एक वेगळी ओळख निर्माण केलीये. आयुष्मान खुरानाचा सर्व प्रवास जवळपास सर्वांनीच बघितला आहे. आयुष्मान खुरानाचे काही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरले आहेत.

2022 मध्ये आतापर्यंत आयुष्मान खुरानाचे दोन चित्रपट रिलीज झाले. मात्र, या दोन्ही चित्रपटांना बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. डाॅक्टर जी हा चित्रपट तर बजेटही काढण्यात यशस्वी झाला नाही.

आता डिसेंबर महिन्यात रिलीज होणारा अ‍ॅक्शन हिरो चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. आयुष्यान खुरानाला या चित्रपटाकडून प्रचंड अशा अपेक्षा आहेत.

आयुष्यान खुराना सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. टायगर श्रॉफसोबत एक खास व्हिडीओ तयार करून आयुष्यान खुराना याने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयुष्यान खुरानाचा हा चित्रपट अनिरुद्ध अय्यर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि आनंद एल यांनी केली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत.

आयुष्मानचा हा बहुचर्चित चित्रपट 2 डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता हा चित्रपट काय धमाका करतो. हे पाहण्यासारखे आहे. जर आयुष्मानचा हा चित्रपटही फ्लाॅप गेला तर त्याच्यासाठी हा मोठा झटका असणार आहे.

आयुष्मान खुरानाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, माझे चित्रपट फ्लाॅप केले तरीही काही जास्त फरक पडत नाही. कारण मुळातच माझे सर्व चित्रपट खूप कमी बजेटचे असतात.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI