Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला जामीन मिळणार? युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दुपारी होणार सुनावणी

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज (27 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज (27 ऑक्टोबर) दुपारी 2.30 वाजता सुनावणी होणार आहे. काल आर्यन आणि अरबाजच्या जामिनावरची चर्चा पूर्ण झाली आहे.

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला जामीन मिळणार? युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दुपारी होणार सुनावणी
Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 10:23 AM

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज (27 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज (27 ऑक्टोबर) दुपारी 2.30 वाजता सुनावणी होणार आहे. काल आर्यन आणि अरबाजच्या जामिनावरची चर्चा पूर्ण झाली आहे. त्यानंतर आज दुपारी 2.30 वाजता जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आर्यन खानने तातडीने उच्च न्यायालयात सुनावणीसाठी धाव घेतली. आर्यन खानचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि सेशन्स कोर्टाने फेटाळल्यानंतर भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे त्याच्यासाठी हजर झाले. त्यांनी आर्यन खानची अटक बेकायदेशीर ठरवली आणि या कारवाईवर एनसीबीलाच गोत्यात टाकले आहे.

दोन आरोपींना मिळाला जामीन

दरम्यान, क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने या जामीन अर्जाला परवानगी दिली आहे. अवीन साहू आणि मनीष राजगरिया यांना जामीन मिळाला आहे. व्ही.व्ही.पाटील यांच्या खंडपीठाने त्यांचा जामीन अर्ज स्वीकारला आहे. या दोघांनाही मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली होती.

एनसीबीने क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध केला, की तो फक्त अंमली पदार्थ घेत असे असे नाही तर त्याच्या अवैध तस्करीतही त्याचा सहभाग होता. आर्यन खान आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी पुराव्यांसोबत छेडछाड करत होत्या आणि तपासावर प्रभाव टाकण्यासाठी साक्षीदारांना प्रभावित करत असल्याचा दावाही एजन्सीने केला आहे.

एनसीबीने दाखल केले प्रतिज्ञापत्र

त्याचवेळी आर्यन खानच्या वकिलांनी हायकोर्टात अतिरिक्त नोट दाखल करताना सांगितले की, एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे आणि काही राजकीय व्यक्तींकडून एकमेकांवर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांशी त्याचा काहीही संबंध नाही. आर्यन खानने हायकोर्टात दाखल केलेल्या जामीन याचिकेला उत्तर म्हणून एनसीबीने मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले.

हे प्रकरण न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलण्याच्या हेतूने त्याचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे एजन्सीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रातून हे स्पष्ट झाले आहे, असे एजन्सीने म्हटले आहे. या प्रकरणात प्रभाकर सेलने एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांवर वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. शपथपत्रात पूजा ददलानीचा संदर्भ देत, या महिलेने तपासादरम्यान साक्षीदारांवर प्रभाव टाकल्याचे दिसते.

हेही वाचा :

Aryan Khan Bail | मोठी बातमी ! आर्यन खानच्या जामिनावरची आजची सुनावणी स्थगित, उद्या पुन्हा युक्तिवाद होणार

Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्रला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; सोहळ्यासाठी 2 महिन्याच्या लेकीसह दिल्लीत हजेरी, पाहा खास फोटो

‘माझे पती बॉलिवूडला टार्गेट करत नाहीयत’, समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ पुढे आली पत्नी क्रांती रेडकर!

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या जामीनाविरोधात NCB, पुरव्यांशी छेडछाडीचा दावा, मॅनेजर पूजा ददलानीचेही नाव समोर!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.