AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | बाहुबली 2 ला मागे टाकत पठाणने मारली बाजी, शाहरुख खान याच्या चित्रपटाने तयार केला हा मोठा रेकाॅर्ड

पठाण (Pathaan) चित्रपटाच्या अगोदर आमिर खान आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते. यामुळे शाहरुख खान याचा पठाण चित्रपट काय धमाका करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

Shah Rukh Khan | बाहुबली 2 ला मागे टाकत पठाणने मारली बाजी, शाहरुख खान याच्या चित्रपटाने तयार केला हा मोठा रेकाॅर्ड
| Updated on: Feb 19, 2023 | 9:54 PM
Share

मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाला रिलीज होऊन आता 24 दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही प्रेक्षकांमध्ये पठाण चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. पठाण या चित्रपटाने ओपनिंग डेलाच अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. जगभरातून पहिल्याच दिवशी पठाण या चित्रपटाने तब्बल 100 कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेल्यानंतर तो मोठ्या पडद्यापासून दूर गेला होता. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची सातत्याने वाढ पाहात होते. शेवटी 25 जानेवारी रोजी शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केली. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पठाण (Pathaan) चित्रपटाच्या अगोदर आमिर खान आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते. यामुळे शाहरुख खान याचा पठाण चित्रपट काय धमाका करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. पठाण चित्रपटातील गाणे बेशर्म रंग यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद सुरू होता. यावेळी अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची थेट मागणी केली होती.

इतकेच नाही तर देशामध्ये अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलनेही करण्यात आली. या वादामध्ये शाहरुख खान किंवा चित्रपटातील संबंधित कोणत्याही व्यक्तीने काहीही भाष्य केले नाही. विशेष म्हणजे शाहरुख खान किंवा चित्रपटाच्या टिमने चित्रपटाचे प्रमोशनही केले नाही.

पठाण या चित्रपटाला आता रिलीज होऊन तब्बल 24 दिवस झाले असूनही अनेक रेकाॅर्ड हा चित्रपट आपल्या नावावर करताना दिसत आहे. विशेष म्हणजे रिपोर्टनुसार पठाण चित्रपटाने बाहुबली 2 चे रेकाॅर्ड तोडल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर पठाण या चित्रपटाने केले आहेत.

बाहुबली 2 या चित्रपटाचे एकूण कलेक्शन हे 510.99 कोटी रुपये होते. पठाण चित्रपटाने चार दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. SS राजामौलीच्या बाहुबली 2 ने ऑस्ट्रेलियात 25.71 कोटीचे कलेक्शन केले होते, तर पठाणने 25.77 कोटी कमावले आहे. पठाण चित्रपटाची हवा अजूनही बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे.

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित