Babil Khan | …म्हणून इरफान खानच्या आठवणी शेअर करणं सोडून दिलं, लेक बाबिलने सांगितले कारण

इरफानच्या निधनानंतर त्याचा मोठा मुलगा बाबिल खान (Babil Khan) सोशल मीडियावर अभिनेत्याशी संबंधित काही आठवणी शेअर करायचा किंवा त्याचे काही न पाहिलेले फोटो देखील शेअर करत होता. ज्यामुळे चाहत्यांना त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधीही मिळाली.

Babil Khan | ...म्हणून इरफान खानच्या आठवणी शेअर करणं सोडून दिलं, लेक बाबिलने सांगितले कारण
बाबिल आणि इरफान खान
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 11:59 AM

मुंबई : गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अभिनेता इरफान खान (Irrfan khan) या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. 29 एप्रिलला इरफानच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण होईल. इरफानच्या निधनानंतर त्याचा मोठा मुलगा बाबिल खान (Babil Khan) सोशल मीडियावर अभिनेत्याशी संबंधित काही आठवणी शेअर करायचा किंवा त्याचे काही न पाहिलेले फोटो देखील शेअर करत होता. ज्यामुळे चाहत्यांना त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधीही मिळाली. पण गेल्या काही दिवसांपासून बाबिलने त्याच्या आठवणी शेअर करणं सोडून दिलं आहे. आता अलीकडेच एका चाहत्याने बाबिलला याचे कारण विचारले (Babil Khan gives reason why he did not share father Irrfan khan memories).

वास्तविक, बाबिल आपल्या पोस्टमधील चाहत्यांच्या त्यांच्या कमेंट्सवर प्रत्युत्तर देत असतो. आता अलीकडे त्याच्या एका पोस्टवर फॅनने कमेंट केली आणि विचारले की, तो आता वडिलांसोबतच्या काही आठवणी का शेअर करत नाही? यावर बाबिलने त्यांना याचे कारण सांगितले आहे.

बाबिलने या पोस्टवर कमेंट केली की, ‘मला शेअर करायला आवडत होतं. परंतु, नंतर मला अशा कमेंट आल्या की, मी त्यांचा वापर करून स्वत: ला प्रमोट करत आहे आणि मला यामुळे खूप वाईट वाटले. मी त्यांच्या आठवणी कुठल्याही स्वार्थाशिवाय शेअर करायचो. म्हणून मी काय करावे आणि काय करू नये याबद्दल मी सध्या संभ्रमित आहे. लोक त्यांच्या कमेंटच्या माध्यमातून मला प्रसिद्धीच्या झोतात यायचे आहे, असा संदेश देतात. मी हे कधीही करू शकत नाही. लोकांच्या या विचाराबद्दल मला खूप वाईट वाटते. म्हणून आता तेव्हाच शेअर करेन, जेव्हा मला असे वाटेल की आता योग्य वेळ आहे.

पाहा बाबिलची कमेंट

Babil Khan Post

बाबिलची कमेंट

(Babil Khan gives reason why he did not share father Irrfan khan memories)

वडिलांना मिळालेली श्रद्धांजली पाहून बाबिल भावूक

काही दिवसांपूर्वी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यादरम्यान, बाबिलने इरफान खान यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला. यानंतर जेव्हा इरफानला शोमध्ये श्रद्धांजली दिली गेली, तेव्हा बाबिल आपले अश्रू रोखू शकला नाही आणि रडू लागला. बाबिलचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते.

आई सुतापा म्हणते…

मुलाचे रडण्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुतापाने मुलगा बाबिल याचे फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक सशक्त संदेश लिहिला. सुतापाने लिहिले की, ‘मेरा बेटा, बड़ा कड़क लौंडा है वो, छिपकर नहीं सबके सामने जार-जार रोता है वो, बड़ा कड़क लौंडा है. बाप की यादों को समेटता है नाज़ुक उंगलियों से, बिखेरता है उन्हें खुश्बू की तरह, सहेजता है उन्हें बंद डायरी में, बड़ा सख्त लौंडा है वो.’

वडिलांचे नाव उज्जवल करण्यास तयार

बाबिल लवकरच अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसच्या ‘काला’ चित्रपटातून डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात बाबिलसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. बाबिलने नुकतेच चित्रपटाच्या पहिल्या वेळापत्रकांचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता इरफानचे चाहते बाबिलच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत आणि बाबिलही आपल्या वडिलांचे नाव उज्ज्वल करण्यास सज्ज झाला आहे.

(Babil Khan gives reason why he did not share father Irrfan khan memories)

हेही वाचा :

बॉलिवूडचं ‘परफेक्ट कपल’ ऐश्वर्या-अभिषेक बच्चन, जाणून घ्या त्यांच्या ‘हॅप्पी मॅरीड लाईफ’चं गुपित…

Indian Idol 12 Update | सवाई भटसोबतच नेहा कक्करही ‘इंडियन आयडॉल’मध्ये गैरहजर! जाणून घ्या कारण…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.