Bigg Boss 15 | शॉकिंग! ‘बिग बॉस 15’ विजेता पदाचा दावेदार उमर रियाझ थेट घराबाहेर!

‘बिग बॉस 15’ची (Bigg Boss 15) अंतिम शर्यत जबरदस्त धक्कादायक आहे. जसजशी फिनालेची तारीख जवळ येत आहे, तसतशी स्पर्धकांमधील स्पर्धा आणि चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. आता बिग बॉसने प्रेक्षकांना मोठा धक्का दिला आहे. शोच्या विजेतापदाचा दावेदार समजला जाणारा खेळाडू उमर रियाजला ‘बिग बॉस 15’मधून बाहेर काढण्यात आले आहे.

Bigg Boss 15 | शॉकिंग! ‘बिग बॉस 15’ विजेता पदाचा दावेदार उमर रियाझ थेट घराबाहेर!
Umar Riyaz

मुंबई :बिग बॉस 15’ची (Bigg Boss 15) अंतिम शर्यत जबरदस्त धक्कादायक आहे. जसजशी फिनालेची तारीख जवळ येत आहे, तसतशी स्पर्धकांमधील स्पर्धा आणि चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. आता बिग बॉसने प्रेक्षकांना मोठा धक्का दिला आहे. शोच्या विजेतापदाचा दावेदार समजला जाणारा खेळाडू उमर रियाजला ‘बिग बॉस 15’मधून बाहेर काढण्यात आले आहे.

शुक्रवारी, बिग बॉसने उमर रियाझचे धक्कादायक एलिमिनेशन करून सर्वांना आश्चर्यचकित केले. उमरचे एलिमिनेशन त्याच्या चाहत्यांनी अद्याप स्वीकारलेले नाही. उमरच्या एलिमिनेशनमुळे सेलिब्रिटींनाही आश्चर्य वाटले आहे. सोशल मीडियावर उमर रियाझचे समर्थक उघडपणे या विरोधात निषेध नोंदवताना दिसत आहेत.

चाहत्यांसाठी देखील हे एलिमिनेशन धक्कादायक आहे, कारण उमरने फिनालेचे तिकीट जिंकले होते आणि गेमचा व्हीआयपी सदस्य देखील बनला होता. एलिमिनेशन होण्याच्या शर्यतीत तो बाहेर पडेल असा विचारही कोणी केला नव्हता. त्याच्या एलिमिनेशनची बातमी समोर येताच सर्वत्र प्रतिक्रिया येऊ लागल्या.

सेलिब्रिटीही शॉक!

हिमांशी खुरानाने ट्विट केले की, ‘त्यांना जे करायचे ते करतात…मत मिळवतात आणि मग सगळा खेळ उधळून देतात…आणि लोकांचे मानसिक आरोग्य बिघडवतात… तू उमर छान खेळतोस..’. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘हे काही आश्चर्यकारक नाही, प्रत्येक हंगामात बीन्स असतात.’ उमरचा भाऊ असीम रियाझनेही दोन शब्दांत जड अंतःकरणाने प्रतिक्रिया दिली आहे. भावाच्या खेळाचे कौतुक करताना त्याने लिहिले, ‘चांगला खेळलास.’

अभिनेता करणवीर बोहराने आश्चर्य व्यक्त करत लिहिले की, ‘उमर रियाझला बाहेर काढण्यात आले हे खरंच धक्कादायक आहे. बिग बॉसचा अजेंडा काय आहे माहीत नाही, पण उमर रियाझ चांगला खेळला.’ मनू पंजाबी, अँडी कुमार, आकांक्षा पुरी, शेफाली बग्गा, किश्वर मर्चंट यांनीही उमरच्या एलिमिनेशनबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

चाहतेही संतापले!

उमर रियाझचे चाहते ट्विटरवर चांगलेच संतापलेले दिसत आहेत. ‘नो उमर रियाझ नो BB15’ ट्रेंडिंग होत आहे. चाहते उमरच्या समर्थनात आहेत आणि त्याच्या एलिमिनेशनच्या विरोधात ट्विट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘बिग बॉस तुमच्यासारख्या सुंदर मनाच्या व्यक्तीसाठी नव्हते. बॉयकॉट BB15’

हेही वाचा :

‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!

सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?

मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?

Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!

Published On - 2:52 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI