Birthday Special | ‘ती’ घटना घडली नसती, तर आज अमिताभ बच्चनची लेकही असती बॉलिवूडमध्ये! वाचा श्वेता नंदाबद्दल…  

श्वेता बच्चन नंदाचा जन्म भारतात झाला होता. परंतु, नंतर ती उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेली. तिथे बरीच वर्षे घालवल्यानंतर श्वेता पुन्हा भारतात परतली.

Birthday Special | ‘ती’ घटना घडली नसती, तर आज अमिताभ बच्चनची लेकही असती बॉलिवूडमध्ये! वाचा श्वेता नंदाबद्दल...  
श्वेता नंदा
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 10:38 AM

मुंबई : बॉलिवूडचा महान नायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कुटुंबामुळे देखील चर्चेत असतात. लोक त्यांच्या कुटुंबास आदर्श मानतात. त्यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा (shweta Bachchan Nanda), जी तिच्या वडिलांच्या विशेष जवळ आहे. ती कदाचित प्रसिद्धीपासून दूर असेल, पण तिचे स्वतःची अशी देखील एक ओळख आहे. आज श्वेता तिचा 47वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित असे काही खास किस्से सांगणार आहोत, ज्यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधून तिने का काढता पाय घेतला, हे कळेल…(Birthday Special story on Amitabh Bachchan Daughter shweta Bachchan Nanda)

पत्रकार बनून काम केले!

श्वेता बच्चन नंदाचा जन्म भारतात झाला होता. परंतु, नंतर ती उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेली. तिथे बरीच वर्षे घालवल्यानंतर श्वेता पुन्हा भारतात परतली. भारतात आल्यावर पत्रकार म्हणून तिने कामही केले. ती एका प्रसिध्न वाहिनीसाठी काम करायची. श्वेताला सुरुवातीपासूनच चर्चेत येण्याची आवड नव्हती. म्हणूनच तिला बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर रहायचे होते. पण, तिला फॅशनची खूप आवड होती. म्हणून तिने 2006मध्ये मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. तिने L’ Officiel Indiaसाठी काम केले.

बालपणातील घटनेमुळे निर्माण झाली भीती!

श्वेताला लिहिण्याची देखील आवड आहे, म्हणूनच तिने तिच्या एका कॉलममध्ये इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचे कारण उघड केले होते. यात तिने आपल्या बालपणातील एका घटनेचा उल्लेख केला होता. तिने सांगितले की, ती लहान असताना तिच्या पालकांचे वेळापत्रक खूप व्यस्त होते. दोघेही कलाकार असल्याने त्यांना शिफ्टमध्ये काम करावे लागायचे. अशा परिस्थितीत ती अनेकदा तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या सेटवर जायची (Birthday Special story on Amitabh Bachchan Daughter shweta Bachchan Nanda).

एक दिवस ती वडील अमिताभ बच्चन यांच्या मेकअप रूममध्ये खेळत होती. त्यावेळी तिचे बोट एका खुल्या सॉकेटमध्ये अडकले. या घटनेमुळे तिच्या मनात खूप भीती निर्माण झाली. तेव्हापासून तिने सेटवर जाणे थांबवले आहे. तिने मोठ्या गमतीने सांगितले की, कदाचित हे देखील एक कारण आहे की तिला मनोरंजन विश्वात पाऊल ठेवण्याची हिम्मतच झाली नाही.

तालीम करूनही संवाद विसरली श्वेता…

श्वेताने एका मुलाखतीत सांगितले होते की, पूर्वी तिला वाटलं की गाणं गाणे आणि अभिनय करणे खूप सोपे आहे. पण शाळेच्या काळात जेव्हा तिला नाटकात अभिनय करायला मिळाला, तेव्हा तिला कळलं की ते किती कठीण आहे. खरं तर, ती एका नाटकात एक हवाईयन मुलगी बनली, यासाठी तिने कठोर रिहर्सल देखील केली होती. असे असूनही, शेवटच्या क्षणी ती आपले संवाद विसरली. ज्यामुळे तो सीन खराब झाला. तो तिच्यासाठी खूप वाईट अनुभव होता.

(Birthday Special story on Amitabh Bachchan Daughter shweta Bachchan Nanda)

हेही वाचा :

‘अण्णा नाईक आहेत ते, परत येणारच’, मुंबईच्या लोकलमध्येही घुमला अण्णा नाईकांचा आवाज!

Oscar 2021 | मुख्य भूमिकेसाठी ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता, वाचा कोण आहे रिज अहमद?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.