बालपणी लैंगिक अत्याचार, 14 व्या वर्षी बलात्कार सलमान खान याच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा
नुकताच सोमी अली हिने एक नवीन व्हिडीओ शेअर करून मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत.

मुंबई : अभिनेत्री सोमी अली हिने काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवली. मात्र, सोमी अलीने पहिल्यांदाच सलमान खान याच्यावर हे आरोप केले नसून यापूर्वीही तिने धक्कादायक खुलासे केले होते. सलमान खान आणि सोमी अली हे एकमेकांना डेट करत होते. इतकेच नाहीतर तिने काही दिवसांपूर्वी हे देखील सांगितले होते की, भारतामध्ये तिचे येण्याचे कारणही सलमान खान हा होता. तिला सलमान खान याच्यासोबत लग्न करायचे होते. नुकताच सोमी अली हिने एक नवीन व्हिडीओ शेअर करून मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत.
सलमान खान याच्यावर आरोप केल्यानंतर लोकांनी सोमीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली. अनेकांनी तू इतक्या दिवस का शांत होती म्हणत हा फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगून टाकले.
View this post on Instagram
आता सोमी अली हिने व्हिडीओ शेअर करत तिच्यासोबत झालेल्या शोषणाविषयी माहिती सांगितली. यावेळी तिने पब्लिसिटी स्टंट करत असल्याचे म्हणत असलेल्या लोकांना उत्तर देखील दिले आहे.
व्हिडीओमध्ये सोमी अली हिने म्हटले, वयाच्या 9 व्या वर्षी मला लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले होते. इतकेच नाही तर 14 वर्षांची असताना बलात्कार झाला होता आणि एका पाकिस्तानी कुकने देखील लैंगिक शोषण केले असल्याचे सामीने म्हटले.
या व्हिडीओमध्ये सोमी अली हिने सलमान खान याने माझी माफी मागावी असेही म्हटले आहे. आता सामी अलीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
