लग्नाच्या पहिल्या रात्री मी रडलाो होतो, शाहरुख खानचा मोठा खुलासा
शाहरुख खान याने एक मोठा खुलासा काही दिवसांपूर्वी केला. शाहरुख खान याने म्हटले की, तो चक्क त्याच्या लग्नाची पहिली रात्री दिवशी रडला होता. नेमकं काय झालं होतं तेव्हा जाणून घ्या.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरूख बॉलिवुडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. 2018 मध्ये झिरो चित्रपट फ्लॉप गेला. तेव्हापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. मात्र शाहरूखसाठी मागील वर्षे एकदम दमदार गेले होतं. एका मागून एक तीन चित्रपट त्याचे रिलीज झाले आणि त्या चित्रपटांनी मोठा धमाका केला. शेवटी त्याचे पठाण चित्रपटातून धमाकेदार पुनरागमन केले. शाहरुख खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार बघितले आहेत. शाहरुख खान याने त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत एक मोठा खुलासा काही दिवसांपूर्वी केला होता.
शाहरुख खान याने म्हटले की, तो चक्क त्याच्या लग्नाची पहिली रात्री दिवशी रडला होता. त्याचे झाले असे की, मी गाैरी खान हिच्यासोबत मुंबईच्या बाहेर लग्न केले. त्यावेळी मी ‘दिल आशना है’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होतो. या चित्रपटाच्या प्रोड्यूसर आणि डायरेक्टर हेमा मालिनी होत्या.
लग्नानंतर मी मुंबईमध्ये परत आलो आणि मी याबद्दल हेमा मालिनी यांना सांगितले. त्यानंतर मला चित्रपटाच्या सेटवर लगेचच बोलवण्यात आले. त्यावेळी माझ्या मित्राने हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. हॉटेलमध्ये पत्नीला सोडून तो थेट चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. मात्र, हेमा मालिनी या त्यावेळी सेटवर उपस्थित नव्हत्या. शाहरुख बऱ्याचवेळ त्यांची वाट पाहत मेकअप रूममध्ये बसला.
शाहरुख खानला तेव्हा रात्रीचे 11 सेटवरच वाजले होते. मात्र, यानंतर शाहरुख खान रात्री दोन वाजता हॉटेलमध्ये परतला. त्यावेळी शाहरुख खान याने पाहिले की, जड दागिने आणि मेकअपमध्ये गाैरी खान ही लोखंडी खुर्चीवरच झोपली होती. त्यावेळी मला माझ्याच निर्णयावर रडू आल्याचे सांगताना शाहरुख खान हा दिसला.
कारण ज्या हॉटेलच्या रूममध्ये गाैरी झोपली होती, तिथेच खूप जास्त डास होते. लग्नानंतरची आमची ती पहिली रात्र होती. त्यानंतर मी काहीच न बोलता गाैरीला घेऊन निघालो. शाहरुख खान याचे हे दिवस बॉलिवूडमधील सुरूवातीच्या काळातील दिवस होते. शाहरुख खान हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक असून त्याची संपत्ती फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही आहे.