बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात खतरनाक चित्रपट, भीतीमुळे प्रेक्षक मधूनच सोडायचे थिअटर, अनेकजण तर महिनाभर झोपलेच नाहीत
26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या बॉलिवूडच्या सायको थ्रिलर चित्रपटानं त्यावेळी चांगलाच धुमाकूळ घातला होता. प्रेक्षक हा चित्रपट पाहाताना घामाघूम व्हायचे.

26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या बॉलिवूडच्या सायको थ्रिलर चित्रपटानं त्यावेळी चांगलाच धुमाकूळ घातला होता. प्रेक्षक हा चित्रपट पाहाताना घामाघूम व्हायचे, त्यांना हा चित्रपट पाहताना भीती वाटायची. त्या काळात या चित्रपटातील खलनायकाची एक वेगळी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली होती. हा चित्रपट त्या काळात ज्यांनी -ज्यांनी पाहिला ते काही महिने नीट झोपू शकले नव्हते असं म्हणतात. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य एवढं भीतीदायक होत की प्रेक्षकांच्या मनावर ते कायमचं कोरलं गेलं. या चित्रपटाच्या खलनायकानं प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण केली होती. आजही या चित्रपटाचं नाव घेतलं तर रक्तानं माखलेला या चित्रपटातील खलनायकाचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहातो. खलनायकाच्या दमदार अभिनयामुळेच चित्रपटानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. चला तर जाणून घेऊयात नेमका कोणता आहे हा चित्रपट?
1998 साली झाला होता प्रदर्शित
1998 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याचं नाव आहे ‘दुश्मन’ ज्यामध्ये संजय दत्त आणि काजोल यांची मुख्य भूमिका होती, तर आशुतोष राणा याने या चित्रपटात व्हिलनची भूमिका केली होती. आशुतोष राणा याने खलनायकाची भूमिका एवढी खतरनाक केली होती की, त्या काळात ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्या लोकांना आजही आशुतोष राणाचा रक्तानं माखलेला चेहरा स्पष्ट आठवतो. असं म्हणतात हा चित्रपट त्या काळात ज्यांनी पाहिला त्यातील अनेक जण महिनाभर स्वस्थ झोपू सुद्ध शकले नव्हते. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण केली होती. या चित्रपटामध्ये आशुतोष राणा याने गोकूळ पंडित नावाची भूमिका केली होती, त्याने साकारलेली ही भूमिका एखादा खरा-खुरा नरभक्षक वाटावा अशीच होती.
या चित्रपटानं त्याला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नवी ओळख मिळून दिली. या चित्रपटामध्ये संजय दत्तने एका दिव्यांग व्यक्तीची भूमिका केली आहे. तर या चित्रपटामध्ये काजोलने सोनिया आणि नौना सहगल असा डबल रोल केला आहे. 145 मिनिटांचा हा चित्रपट होता.
