Trishala Dutt : सात वर्षांच्या रिलेशनशिप नंतर ब्रेकअप…, संजय दत्तची मुलगी त्रिशालाने सांगितली खासगी गोष्ट

त्रिशाला फिजिओथेरपिस्ट असून सोशल मीडियावर बर्‍याच समस्यांविषयी ती जागरूकता निर्माण करते.(Breakup after seven years of relationship…, Sanjay Dutt's daughter Trishala tells a private story)

  • Updated On - 1:38 pm, Sun, 25 April 21
Trishala Dutt : सात वर्षांच्या रिलेशनशिप नंतर ब्रेकअप…, संजय दत्तची मुलगी त्रिशालाने सांगितली खासगी गोष्ट

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची (Sanjay Dutt) मुलगी त्रिशाला दत्त (Trishala Dutt) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असते. त्रिशाला फिजिओथेरपिस्ट असून सोशल मीडियावर बर्‍याच समस्यांविषयी ती जागरूकता निर्माण करते. रविवारी त्रिशलानं तिच्या चाहत्यांशी इन्स्टाग्राम स्टोरीवरुन संवाद साधला. ज्यामध्ये तिनं सांगितले की जर तुम्हाला कुणी रिलेशनशिपमध्ये फसवलं असेल तर त्यातून बाहेर कसं पडायचं. त्रिशलानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. (Breakup after seven years of relationship…, Sanjay Dutt’s daughter Trishala tells a private story)

इन्स्टाग्राम स्टोरीवर विचारले चाहत्यांनी प्रश्न

एका चाहत्यानं त्रिशलाला विचारले, तुला प्रेमात फसवलं गेलं आहे का? यावर तिने उत्तर दिलं – हो… त्याचवेळी, दुसर्‍या चाहत्यानं विचारलं की तिचं सर्वात मोठं रिलेशन किती दिवस टिकले?  आणि ब्रेकअप का झालं?

सात वर्षे होती रिलेशनशिपमध्ये…

त्रिशालानं सांगितलं की तिचं सर्वात मोठं नातं सात वर्षे टिकलं. हे नातं का मोडलं यावर उत्तर देताना त्रिशाला म्हणाली की आम्ही दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आमचं नातं पुढे आणायचं होतं पण त्यावेळी मी तयार नव्हते आणि त्या वर्षांत आमच्यात खूप फरक पडला. थोडक्यात म्हटलं तर आम्ही दोघंही वेगळे झालो होतो. असं घडत असतं, असं घडू शकतं. आज तो विवाहित आहे आणि त्याला मुलं आहेत. मी त्याला शुभेच्छा देते…

त्रिशाला संजय दत्त आणि त्यांची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी आहे. ती सध्या आजीबरोबर परदेशात राहते.

टॉक्सिक नात्यातून बाहेर

काही काळापूर्वी त्रिशाला टॉक्सिक नात्याबद्दल बोलली होती. तिनं सांगितलं होतं की तिच्या प्रियकरानं हळूहळू तिला आपल्या मित्रांपासून वेगळं केलं आणि त्रिशाला याचीही कल्पना नव्हती. त्रिशाला जेव्हा जेव्हा घराबाहेर पडायची किंवा परत यायची तेव्हा ती तिच्या प्रियकराला मॅसेज करुन सांगत होती. मात्र त्या मॅसेजला तिचा प्रियकर विचित्र उत्तर द्यायचा. ते वाचल्यानंतर तिला वाटलं की ती जे करत आहे ते करायला नको. ती आता या नात्यातून बाहेर आली आहे. स्वत:ला एकनिष्ठ असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्रिशालाने स्वत:ला सोशल मीडियापासून दूर केले होतं.

त्रिशालाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सांगितलं होतं की या टॉक्सिक नात्यातून बाहेर पडल्यानं ती बरंच काही शिकली आहे, ज्यामुळे ती एक चांगली व्यक्ती बनली आहे.

संबंधित बातम्या

Photo: रुबीना दिलैकची दिलकश अदा, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!

Birthday Special : रोमँटीक गाणी गाणाऱ्या अरिजीत सिंहचा घटस्फोट, आता एका मुलीच्या आईसोबत थाटला संसार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI