Drishyam 2 | ‘दृश्यम 2’च्या घोषणेनंतर अडचणीत सापडला चित्रपट, निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल

मल्याळम चित्रपट ‘दृष्यम 2’ (Drishyam 2) सुपरहिट झाल्यानंतर सर्वजण त्याच्या हिंदी रिमेकच्या प्रतीक्षेत होते. अजय देवगण (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’सह पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळेल, याची वाट चाहते पाहत होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:27 AM, 5 May 2021
Drishyam 2 | ‘दृश्यम 2’च्या घोषणेनंतर अडचणीत सापडला चित्रपट, निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल
दृश्यम 2

मुंबई : मल्याळम चित्रपट ‘दृष्यम 2’ (Drishyam 2) सुपरहिट झाल्यानंतर सर्वजण त्याच्या हिंदी रिमेकच्या प्रतीक्षेत होते. अजय देवगण (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’सह पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळेल, याची वाट चाहते पाहत होते. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे. मंगळवारी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे की, या चित्रपटाचे हिंदी हक्क विकत घेतले गेले आहेत. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकच्या घोषणेमुळे तो काही अडचणींमध्येही सापडला आहे (Case file against Drishyam 2 producer after film announcement).

‘दृश्यम 2’ हिंदीचे हक्क पॅनोरामा स्टुडिओ आणि कुमार मंगत यांनी एकत्र खरेदी केले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दृष्यमचा पहिला भाग पॅनोरामा आणि कुमार मंगत यांच्यासह ‘व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स’नी तयार केला होता. यावेळी त्याने कुमार मंगत आणि पॅनोरामाबरोबर टीम बनवली आणि ‘व्हायकॉम 18’ला बाजूला सारल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटावर आपलाही हक्क असल्याचे ‘व्हायकॉम 18’ने म्हटले आहे.

निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘व्हायकॉम 18’ने कुमार मंगत यांना सांगितले आहे की, आपण अशा प्रकारे त्यांना या प्रकल्पातून वेगळे करू शकत नाही. इतकेच नाही तर, त्यांनी असेही म्हटले आहे की, दृश्यम 2 ते इतर कोणासोबतही एकत्र बनवू शकत नाही. कुमार मंगात हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार होतेच की, व्हायकॉम 18ने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी लवकरच होणार आहे.

कुमार मांगत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रथम काहीही बोलण्यास नकार दिला. त्यानंतर आता त्याने पॅनोरमा स्टुडिओसह चित्रपट बनवत असल्याचे अधिकृतरित्या सांगितले आहे. ईटाइम्सच्या अहवालानुसार मंगत यांनी यापूर्वी या प्रकल्पाबद्दल व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सला सांगितले होते, पण त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही (Case file against Drishyam 2 producer after film announcement).

‘दृश्यम’ला प्रेक्षकांची पसंती

‘दृश्यम’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, तब्बू आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि निशिकांत कामत यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. आता त्याच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलायचे तर, अहवालानुसार अजय देवगन आणि तब्बू आपल्या भूमिकेतून पुन्हा एकदा सर्वांना चकित करताना दिसू शकतात. तथापि, अद्याप चित्रपटाचे दिग्दर्शक आणि स्टारकास्ट याबद्दल कोणतीही घोषणा झालेली नाही. आता चाहते स्टारकास्टच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकताच ‘दृष्ट्याम 2’ मल्याळममध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला खूप पसंती मिळाली आहे. समीक्षकांसह, हा चित्रपट प्रेक्षकांनाही आकर्षित करू शकला आहे.

(Case file against Drishyam 2 producer after film announcement)

हेही वाचा :

जेव्हा मिश्रांची लेक भोसलेंच्या घरची सून होते, वाचा संकेत-सुगंधाच्या ‘प्यारवाली लव्हस्टोरी’बद्दल…

TMKOC | …आणि पत्नी दयाबेनला ‘ए पागल औरत’ म्हणणं ‘जेठालाल’ला महागात पडलं! वाचा किस्सा…