मुघलांचा इतिहास शिकवतात, संभाजी महाराजांचा का नाही? विकी कौशल यांच्या ‘छावा’ नंतर युवा पिढीचा प्रश्न
Aurangzeb and Chhatrapti Sambhaji Maharaj Enmity: छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पहिले युद्ध लढले. वयाच्या 32 व्या वर्षी आयुष्यातील शेवटचे युद्ध लढले. फक्त दहा वर्षांच्या कमी कालावधीत त्यांनी एकूण 120 लढाया लढल्या. या सर्व लढाया जिंकल्या. मुघल शासक औरंगजेब मराठा साम्राज्यावर विजय मिळवण्याचे स्वप्नच पाहत राहिला. छावा चित्रपटामुळे संभाजी महाराज यांचा इतिहास पुन्हा एकदा देशात अन् जगभरात पसरला.

Chava Movie Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांचे अनोखे चरित्र विकी कौशल यांचा छावा चित्रपटामुळे जगभरातसमोर आले आहे. देशातील शालेय अभ्यासक्रमात मुघलांचा इतिहास शिकवला जातो. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे भारताचा क्रिकेट खेळाडू नीरज चोपडा संतप्त झाला. छावा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न विचारत त्याने कोट्यवधी भारतीयांच्या भावनांना हात घातला. चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराज यांचा इतिहास समजल्याचे सांगत नीरज चोपडा याने दिल्लीतील रस्त्याचे नाव औरंगजेब रोड का आहे? असा प्रश्न विचारला. दुसरी संतप्त प्रतिक्रिया गुजरातमधून आली. छत्रपती संभाजी महाराजांवर मुघलांनी केलेले अत्याचार पाहून...