Kartik Aaryan | करण जोहरशी पंगा, ‘दोस्ताना 2’मधून कार्तिक आर्यनला दाखवला बाहेरचा रस्ता!

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan johar) याने 2019मध्ये आपल्या ‘दोस्तना’ या चित्रपटाचा सिक्वल जाहीर केला होता. यात अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार कार्तिक आर्यन आता ‘दोस्ताना 2’चा भाग असणार नाहीय.

Kartik Aaryan | करण जोहरशी पंगा, ‘दोस्ताना 2’मधून कार्तिक आर्यनला दाखवला बाहेरचा रस्ता!
दोस्ताना 2
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 5:02 PM

मुंबई : निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan johar) याने 2019मध्ये आपल्या ‘दोस्तना’ या चित्रपटाचा सिक्वल जाहीर केला होता. यात अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार कार्तिक आर्यन आता ‘दोस्ताना 2’चा भाग असणार नाहीय. एका व्यापार स्त्रोताने कार्तिकच्या या चित्रपटातून एक्झिटविषयी वक्तव्य केले आहे. इतकेच नाही, तर धर्मा प्रॉडक्शन कार्तिक आर्यनबरोबर भविष्यात कधीच काम करणार नसल्याचे म्हटले आहे (Clashes between Karan Johar and Kartik Aaryan actor leaves the film).

यामागचे कारण कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातला कलह असल्याचे बोलले जात आहे. तसेच कार्तिकमध्ये क्रिएटिव्ह मतभेद देखील झाले आहेत. मात्र, कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार सुरुवातीला कार्तिकला या चित्रपटाच्या तारखा आणि शेड्युल याबाबत तक्रारी होत्या. ज्यामुळे पुढे अनेक समस्या सुरू झाल्या. यापूर्वीही असं म्हटलं जात होतं की, कार्तिकने या चित्रपटाचं शूटिंग कित्येक महिने पुढे ढकललं होतं. तर, हा चित्रपट सोडून त्याने राम माधवानीच्या ‘धमाका’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते, त्यामुळे करण त्याच्यावर चिडला होता.

कोरोनामुळे करण गप्प!

वृत्तानुसार, बर्‍याच दिवसांपासून कार्तिक कोरोना व्हायरसच्या साथीमुळे शूटिंग पुढे ढकलण्याविषयी बोलत होता. त्याला सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यायची इच्छा होती, यामुळे करण जोहरने देखील त्याला शूटबद्दल विचारले नाही. पण, जेव्हा त्याने ‘धमाका’चे चित्रीकरण पूर्ण केले, तेव्हा करण जोहर त्याच्यावर संतापला. त्यांनी अनेक बैठका घेतल्या ज्यात करण जोहरनेही आपला संताप व्यक्त केला. ज्यानंतर कार्तिक आणि करण यांच्यात वादावादी झाली. शशांक खेतानचा ‘वॉरियर’ हा चित्रपट शाहिद कपूरला देण्यात आल्यानंतर देखील कार्तिक धर्मा प्रॉडक्शनवर चिडला होता. शाहिदने हा चित्रपट नाकारला असला, तरी ही भूमिका कार्तिककडे गेली नाही (Clashes between Karan Johar and Kartik Aaryan actor leaves the film).

‘दोस्ताना 2’सोडून इतर चित्रपटांचे चित्रीकरण

कार्तिक आर्यनकडे जेव्हा दोस्ताना 2च्या शूटिंगसाठी तारखा नव्हत्या, त्यामुळे करणने विकी कौशलसोबत ‘मिस्टर लेले;चे शूटिंग सुरू केले आहे. कार्तिकला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने प्रॉडक्शन हाऊसला सांगितले की, आपल्याकडे ‘दोस्ताना 2’ साठी केवळ एप्रिलपासूनच्या तारखा आहेत. करणला जेव्हा कार्तिकच्या या गोष्टींबद्दल कळले तेव्हा त्याने कार्तिकला या चित्रपटातून रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार करण आणि कार्तिक दोघांचेही संभाषण पूर्णपणे बंद झाले आहे.

करणा जोहरच्या ‘दोस्ताना 2’ मध्ये जान्हवी कपूर आणि लक्ष्य, कार्तिक आर्यनसोबत झळकणार होते. या चित्रपटाद्वारे लक्ष्य बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. कार्तिक आर्यनच्या जागी करण जोहर या चित्रपटात कोणता अभिनेता घेणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Clashes between Karan Johar and Kartik Aaryan actor leaves the film)

हेही वाचा :

Indian Idol 12 | छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार ‘म्युझिकल रामायण’, मोहम्मद दानिश गाणार हनुमान चालीसा!

Video | सलमानसाठी सलमानचा फोन आणि थेट बॉलीवुडचं तिकिट, सलमानची स्टोरी ऐका खुद्द सलमान खानकडून

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.