सुनील शेट्टीच्या इमारतीत कोरोनाचा विस्फोट, मुंबई महानगरपालिकेने केली बिल्डींग सील!

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी मुंबई येथील पृथ्वी अपार्टमेंट्सच्या निवासी इमारतीला सील केले आहे. या इमारतीत बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यानंतर बीएमसीने या इमारतीला सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनील शेट्टीच्या इमारतीत कोरोनाचा विस्फोट, मुंबई महानगरपालिकेने केली बिल्डींग सील!
सुनील शेट्टी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी मुंबई येथील पृथ्वी अपार्टमेंट्सच्या निवासी इमारतीला सील केले आहे. या इमारतीत बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यानंतर बीएमसीने या इमारतीला सील करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) आपल्या कुटुंबासमवेत राहतो, तीच ही इमारत आहे. बीएमसीचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, सुनील शेट्टी यांचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे. त्याच्या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही.

प्रोटोकॉलनुसार कोरोनाचे पाच सक्रिय रुग्ण एखाद्या इमारतीतून आढळल्यास बीएमसीने त्यावर सील केले आहे. सुनील शेट्टी ज्या इमारतीत राहत आहेत, त्या इमारतीत कोरोनाचे पाचहून अधिक सक्रिय प्रकरणे आढळून आली असून, त्यानंतर ही इमारत सील केली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीत 30 मजले असून, त्यामध्ये सुमारे 120 फ्लॅट आहेत. ही इमारत मुंबईच्या डी-वॉर्ड अंतर्गत येते.

10 निवासी इमारत सील

सध्या मुंबईच्या डी-वॉर्डमधील सुमारे 10 निवासी इमारती सील करण्यात आल्या आहेत. या भागात मलबार हिल आणि पेडर रोडचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीय. मुंबईबद्दल बोलायचे तर, सोमवारी मुंबईत 555 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. या नवीन प्रकरणानंतर आता मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे, तर मृतांचा आकडा 15 हजारांच्यावर आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतून अद्यापपर्यंत लोक बाहेर आले नाहीत की, आता तिसरी लाट दार ठोठावण्यास तयार आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट लवकरच देशात धडकू शकते, जी यावेळी मुलांसाठी प्राणघातक ठरू शकते. वृद्ध आणि तरुणांना कोरोनाची लस मिळत असल्याने या तिसऱ्या लाटेचा परिणाम त्यांच्यावर कमी प्रमाणात दिसून येईल. अशा परिस्थितीत ही लाट मुलांना टार्गेट करेल, कारण मुलांची प्रतिकारशक्ती देखील कमी आहे आणि त्यांच्यासाठी अद्याप लसीकरणासाठी मंजूरी मिळालेली नाही.

(Corona blast in Sunil Shetty building Mumbai Municipal Corporation seals the building)

हेही वाचा :

Bhuj The Pride Of India : ‘मराठा सिर्फ दो ही बात जानता है, मारना या मरना!’, ‘भुज’चा जबरदस्त ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल व्वा!

VIDEO : मंदिरा बेदीचा आईसोबत वॉक; पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच स्पॉट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI