AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | प्रिती झिंटा विरोधात संतापाची लाट, युजर्सनी सुनावले खडेबोल, थेट केली ही मोठी मागणी

बाॅलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसत नाही. मोठ्या पडद्यापासून प्रिती झिंटा ही दूर आहे. चाहते सतत प्रिती झिंटा हिच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Video | प्रिती झिंटा विरोधात संतापाची लाट, युजर्सनी सुनावले खडेबोल, थेट केली ही मोठी मागणी
| Updated on: Apr 07, 2023 | 6:07 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, प्रिती झिंटा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो शेअर करताना प्रिती झिंटा कायमच दिसते. मात्र, मोठ्या पडद्यावर प्रिती झिंटा कधी पुनरागमन करणार हा प्रश्न सातत्याने चाहते विचारताना दिसतात. विशेष म्हणजे प्रिती झिंटा हिची फॅन फाॅलोइंग (Fan following) जबरदस्त आहे. चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटामध्ये प्रिती झिंटा हिने जबदरस्त अशी भूमिका केली आहे. एक काळ प्रिती झिंटा हिने बाॅलिवूड क्षेत्रामध्ये गाजवला आहे. चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटात प्रिती झिंटा हिच्यासोबत सलमान खान (Salman Khan) मुख्य भूमिकेत होता.

सध्या सोशल मीडियावर प्रिती झिंटा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. प्रिती झिंटा हिचा व्हायरल होणारा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना देखील अजिबात आवडला नाहीये. अनेकांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर प्रिती झिंटा हिचा क्लास लावण्यास सुरूवात केलीये.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्रिती झिंटा ही गडबडीत गाडीमध्ये बसताना दिसत आहे. हा व्हिडीओ मुंबईमधील आहे. यावेळी पापाराझी देखील प्रिती झिंटा हिला थांबण्यास सांगतात. मात्र, उशीर होत असल्याचे कारण सांगत प्रिती झिंटा ही गाडीमध्ये बसते. यावेळीच प्रिती झिंटा हिच्या गाडीजवळ एक दिव्यांग व्यक्ती जातो.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

यावेळी तो दिव्यांग व्यक्ती हा प्रिती झिंटा हिला मदत मागताना दिसतोय. मात्र, याकडे दुर्लक्ष करत प्रिती झिंटा तिथून निघून जाते. विशेष बाब म्हणजे गाडी वळवताना परत एकदा तो व्यक्ती प्रिती झिंटा हिच्या गाडीजवळ जातो तरीही प्रिती झिंटा हिने या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा दिव्यांग व्यक्ती व्हिलचेअर दिसतोय.

एका युजर्सने प्रिती झिंटा हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, टिम खरेदी करण्यासाठी हिच्याकडे 100 कोटी आहेत, मात्र, एका दिव्यांग व्यक्तीला 100 रूपये नाहीत हिच्याकडे देण्यासाठी, दुसऱ्याने लिहिले की, हिच्याकडे या दिव्यांग व्यक्तीला पैसे देण्यापुरते देखील पैसे नाहीत? तिसऱ्याने लिहिले की, खरोखरच ही निंदनीय बाब आहे. एकाने तर थेट कमेंट करत या दिव्यांग व्यक्तीची माफी प्रिती झिंटाने मागावी असे म्हटले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच