AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरआरआर टिमचा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ पाहून चाहते हैराण, म्हणाले, हे चुकीचे…

ऑस्कर पुरस्कार 2023 सोहळ्यातील अनेक व्हिडीओ पुढे येताना दिसत आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

आरआरआर टिमचा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ पाहून चाहते हैराण, म्हणाले, हे चुकीचे...
| Updated on: Mar 13, 2023 | 10:05 PM
Share

मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांची आज जगभर चर्चा होताना दिसत आहे. आरआरआर चित्रपटाने आज एक नवा आणि मोठा इतिहास रचला आहे. 95 व्या ऑस्कर पुरस्कार 2023 भारतीय चित्रपट आरआरआर याला ऑस्कर पुरस्कार (Oscar award) मिळालाय. चित्रपटातील गाणे नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगिरीतून हा पुरस्कार मिळालाय. हा पुरस्कार मिळाल्यापासून देशभरात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. सर्वत्र आज फक्त आणि फक्त एसएस राजामौली आणि आरआरआर (RRR) टिमचे काैतुक होताना दिसत आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीला आनंद झालाय.

सध्या ऑस्कर पुरस्कार 2023 सोहळ्यातील अनेक व्हिडीओ पुढे येताना दिसत आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केलाय. ऑस्कर पुरस्कार 2023 मधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये एसएस राजामौली, त्याची पत्नी आणि चित्रपटाची टिम दिसत आहे. जेंव्हा पुरस्कार सोहळ्यात आरआरआर चित्रपटाचे नाव घेतले गेले, त्यावेळी सर्वांनीच जल्लोष केला. मात्र यावेळी दिसत आहे की, आरआरआर चित्रपटाच्या टिमला शेवटच्या लाईनमध्ये या सोहळ्यात बसवण्यात आले आहे.

व्हिडीओ बघून अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केलीये. एका युजर्सने लिहिले की, शेवटच्या बेंचपासून पहिल्या बेंचपर्यंतचा हा प्रवास आपण भारतीय नक्कीच ठरवू…दुसऱ्या युजर्सने लिहिले की, थिएटरमधील सर्वात शेवटची सीट कायमच खूप महाग असते….तिसऱ्याने लिहिले की, काही हरकत नाही शेवटीची तर शेवटीची सीट…पण हे चुकीचे आहे.

नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केलाय. करण जोहर याने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. आरआरआर चित्रपटाच्या टिमचे काैतुक करत रजनीकांत यांनीही सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचे काैतुक केले आहे.

करण जोहर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर नाटू नाटू गाण्याला हा पुरस्कार भेटल्यानंतर आपल्याला किती जास्त आनंद झाला हे पोस्टमध्ये म्हटले आहे. देशातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आरआरआर टिमचे काैतुक केले आहे. आरआरआर टिमवर काैतुकांचा वर्षाव केला जात आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.