ऐश्वर्या रायपासून ते अजय देवगणपर्यंत, ‘या’ बॉलिवूडच्या कलाकारांच्या जाहिराती अडकल्या वादात!

बॉलिवूडचे कलाकार जितके त्यांच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत, तितकेच ते त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंटसाठीही प्रसिद्ध आहेत. फिल्मी दुनियेत असे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत, जे त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंटसाठी जास्त पैसे घेतात.

ऐश्वर्या रायपासून ते अजय देवगणपर्यंत, ‘या’ बॉलिवूडच्या कलाकारांच्या जाहिराती अडकल्या वादात!
Aishwarya - Ajay

मुंबई : बॉलिवूडचे कलाकार जितके त्यांच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत, तितकेच ते त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंटसाठीही प्रसिद्ध आहेत. फिल्मी दुनियेत असे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत, जे त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंटसाठी जास्त पैसे घेतात. पण कधी-कधी स्टार्स नकळत अशा ब्रँडला अॅन्डॉर्स करतात, ज्यासाठी त्यांना खूप टीकेला सामोरे जावे लागते. अमिताभ बच्चनपासून ते आलिया भट्ट, ऐश्वर्या राय बच्चन, यामी गौतम आणि मिलिंद सोमणपर्यंत असे अनेक स्टार्स आहेत, जे त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंट्सच्या वादात अडकले आहेत. चला तर मग पाहूया या यादीत कोणाकोणाचा समावेश आहे…

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या रायने 2015 मध्ये एक जाहिरात केली होती ज्यात ती गरीब मुले आणि कुपोषित मुलांसोबत छत्री घेऊन उभी राहणे वादाचे कारण बनले होते. या वादानंतर काही दिवसांनी ही जाहिरात मागे घेण्यात आली.

यामी गौतम

यामी गौतमने विकी डोनर या चित्रपटातून पदार्पण केले. यामी सुरुवातीपासून फेअरनेस क्रीमची जाहिरात करत होती. या क्रीमच्या जाहिरातीमुळे यामी गौतमला खूप ट्रोल करण्यात आले.

आलिया भट्ट

आलिया भट्ट नुकतीच तिच्या मान्यावरच्या जाहिरातीमुळे खूप चर्चेत आली होती. कन्यादानशी संबंधित जाहिरातीमुळे त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते. उत्पादनाच्या जाहिरातीसाठी धर्म आणि परंपरेचा वापर हे वादाचे कारण बनले होते.

शाहरुख खान

शाहरुख खानला त्याच्या जाहिरातीतील निवडीवरून सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. शाहरुख खानने फेअरनेस क्रीमची जाहिरात केली होती, ज्यासाठी तो खूप ट्रोल झाला होता. वादानंतरही शाहरुख खानने या ब्रँडसाठी फोटोशूट केले, यासोबतच तो अजय देवगणसोबत नुकत्याच केलेल्या एका जाहिरातीमुळेही चर्चेत आला.

अजय देवगण

अजय देवगणनेही त्याच्या एका जाहिरातीमुळे खूप चर्चेत आला होता. खरंतर अजय देवगणला एका पान मसाला जाहिरातीमुळे खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांने ती जाहिरात पुन्हा घेतली नाही.

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन अनेक जाहिराती करतात. त्यांचे चाहतेही त्यांच्या जाहिरातींनी खूप प्रभावित झाले आहेत. अलीकडेच बिग बींनी एका पान मसाला ब्रँडची जाहिरात केली होती. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आले. आता ‘बिग बीं’नी या पान मसाला ब्रँडसोबतचा करार रद्द केला आहे. अमिताभ बच्चन यांनी अधिकृत निवेदन जारी करून या ब्रँडसोबतचा त्यांचा करार रद्द करण्याची माहिती दिली आहे. या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, बिग बींनी या ब्रँडपासून स्वतःला दूर केले आहे. कमला पसंद जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी, अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि त्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

Amana Sharif : आमना शरीफने शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहते म्हणाले- Ufff

‘बाबू’मध्ये नेहा महाजनची एंट्री, लॉकडाऊननंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार मराठीत ॲक्शनचा तडका!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI