Good News | श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्याचे आगमन, गोड बातमी देताना झाली भावूक

Good News | श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्याचे आगमन, गोड बातमी देताना झाली भावूक
श्रेया घोषाल

गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ‘आई’ बनली आहे. आज (22 मे) दुपारी तिने मुलाला जन्म दिला आहे. श्रेयाने स्वत: ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

Harshada Bhirvandekar

|

May 22, 2021 | 5:34 PM

मुंबई : गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ‘आई’ बनली आहे. आज (22 मे) दुपारी तिने मुलाला जन्म दिला आहे. श्रेयाने स्वत: ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. श्रेयाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘आज दुपारी देवाने आम्हाला मुलाच्या स्वरुपात अनमोल आशीर्वाद दिला आहे. ती खूप इमोशनल गोष्ट आहे. यापूर्वी असे कधी वाटले नव्हते. शिलादित्य आणि मी हा आनंद आमच्या कुटूंबियांसमवेत साजरा करत आहोत. तुमच्या सर्व आशीर्वादांबद्दल तुमचे आभार.'(Good News Singer shreya ghoshal blessed with baby boy)

श्रेयाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक सेलेब्रीटीज त्यांचे अभिनंदन करत आहेत आणि त्याचवेळी तिला स्वतःची आणि मुलाची काळजी घेण्यास सांगत आहेत.

पाहा पोस्ट

आधीच ठरवले बाळाचे नाव

जेव्हा श्रेयाने तिची गुडन्यूज शेअर केली तेव्हा तिने तिच्या बाळाचे नावही सांगितले. श्रेयाने आपला बेबी बंप फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘बेबी श्रेयादित्य ऑन द वे! शिलादित्य आणि मी तुमच्या सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर करण्यासाठी उत्साही आहोत. आम्हाला आपल्या प्रेमाची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे, कारण आम्ही आपल्या जीवनाच्या नवीन अध्यायासाठी स्वतःला तयार करत आहोत.’ श्रेयाने 2015मध्ये शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केले होते.

वाईट काळातही आनंदची उधळण

लॉकडाऊन दरम्यान श्रेयाचे ‘आंगना मोरे’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. श्रेयाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, जेव्हा लॉकडाऊन दरम्यान ती खूप कंटाळली होती, तेव्हा तिला या गाण्याची कल्पना सुचली. ती म्हणते की, हा वाईट काळ सगळ्यांसाठीच निराशाजनक होता. सगळेच जण यातून बाहेर पडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होते. मात्र, या वाईट काळातही आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव झाला, असे श्रेया म्हणाली.(Good News Singer shreya ghoshal blessed with baby boy)

पाच वर्षानंतर शेअर केले लग्नाचे फोटो!

श्रेयाने 2015 मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली. श्रेयाने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित लग्न केलं होतं. विशेष म्हणजे तिने त्यावेळी लग्नातला केवळ एकच फोट शेअर केला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बंगाली रितीरिवाजानुसार श्रेया-शिलादित्यचं लग्न झालं होतं.

श्रेयाची कारकीर्द

छोट्या पडद्यावरील ‘सा रे ग म प’ ही स्पर्धा जिंकल्यानंतर श्रेयाने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने ‘देवदास’ या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून कलाविश्वात पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. श्रेया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. बऱ्याच वेळा श्रेया पती शिलादित्यसोबतचे फोटो शेअर करत असते.

(Good News Singer Shreya Ghoshal blessed with baby boy)

हेही वाचा :

PHOTO | रायमा सेनने ‘टॉपलेस’ फोटोशूट शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा, बोल्डनेस पाहून चाहतेही झाले घायाळ!

PHOTO | रणवीर सिंहप्रमाणेच त्याचा लूक-अ-लाईक देखील प्रसिद्ध अभिनेता, फोटो पाहून बुचकळ्यात पडाल!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें