Happy Birthday Javed Jaffrey | केवळ अभिनेताच नाही तर जावेद जाफरीच्या अंगी आणखीही अनेक कलागुण, जाणून घ्या खास गोष्टी…

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जावेद जाफरी (Javed Jaffrey) यांचा 4 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. अभिनयाचा वारसा लाभलेल्या बॉलिवूड कलाकारांपैकी तो एक आहे. जावेद जाफरी याची चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून विशेष कारकीर्द नसली, तरी सहकलाकार म्हणून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Happy Birthday Javed Jaffrey | केवळ अभिनेताच नाही तर जावेद जाफरीच्या अंगी आणखीही अनेक कलागुण, जाणून घ्या खास गोष्टी...
Javed jaffery

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जावेद जाफरी (Javed Jaffrey) यांचा 4 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. अभिनयाचा वारसा लाभलेल्या बॉलिवूड कलाकारांपैकी तो एक आहे. जावेद जाफरी याची चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून विशेष कारकीर्द नसली, तरी सहकलाकार म्हणून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज जावेद जाफरीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत…

जावेद जाफरी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि कॉमेडियन जगदीप यांचा मुलगा आहे. जावेदने 1985 मध्ये ‘मेरी जंग’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटातील ‘बोल बेबी बोल’ गाण्यात जावेद जाफरीने जबरदस्त डान्स केला आणि त्याचे गाणे खूप हिट झाले. पहिल्याच चित्रपटात त्याच्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तोपर्यंत लोक जावेद जाफरीच्या डान्सचे चाहते झाले होते.

अभिनेता असण्याबरोबरच अनेक कलागुण!

तथापि, जावेद जाफरी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून स्वत:ला स्थापित करू शकला नाही. यानंतर त्याने वडील जगदीप यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या. जावेद जाफरी हा एक उत्कृष्ट सहकलाकार तर आहेच पण तो अभिनेता, नर्तक आणि कॉमेडियन देखील आहे. त्याचा आवाज जगभरातील लोकांना आवडला आहे. त्याने मिकी माऊस टू गुफी आणि डॉन कार्नेजसह आंतरराष्ट्रीय कार्टूनसाठी आवाज देखील डब केला आहे.

विनोदी भूमिका विशेष गाजल्या!

जावेद जाफरीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे, तर त्याने ‘तहलका’, ‘ओह डार्लिंग ये है इंडिया’, ‘अर्थ’, ‘डबल धमाल’, ‘जजंतरम ममंत्रम’, ‘सलाम नमस्ते’, ‘ता रा रम पम’, ‘धमाल’, ‘सिंग इज किंग’, ‘3 इडियट्स’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका केल्या आहेत, ज्याचे पडद्यावर खूप कौतुक झाले आहे. इतकेच नाही तर भारतातील पहिला डान्स रिअॅलिटी शो ‘बूगी वूगी’ जावेद जाफरी यानेच सुरू केला होता.

15 वर्षे चालला ‘बूगी वूगी’!

त्याने त्याचा भाऊ नावेद जाफरीसोबत हा रिअॅलिटी शो होस्ट केला होता. ‘बूगी वूगी’ जवळपास 15 वर्षे चालला आणि या शोने बरीच चर्चा निर्माण केली. या शोने मनोरंजन विश्वाला अनेक उत्तम नर्तक दिले आहेत. जावेद जाफरी जाहिरातींच्या दुनियेतही सामील झाला आहे. मनोरंजन क्षेत्रात तो 1980 पासून मॉडेल, कोरिओग्राफर, कॉपी रायटर, निर्माता-दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. जावेद जाफरी हा त्याच्या खास कॉमेडी शैलीसाठी ओळखला जातो. प्रत्येक वेळी तो स्वत:ची वेगळी आणि नवीन स्टाईल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

हेही वाचा :

Bob Biswas Review : ‘सुपारी किलर’च्या भूमिकेत अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय, वाचा कसा आहे ‘बॉब बिस्वास’…

Brahma Mishra Death | मित्रासोबत धमाल डान्स, ‘ललित’ फेम ब्रह्मा मिश्राचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI