Bob Biswas Review : ‘सुपारी किलर’च्या भूमिकेत अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय, वाचा कसा आहे ‘बॉब बिस्वास’…

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री चित्रागंदा सिंह (Chitrangada Singh) स्टारर चित्रपट ‘बॉब बिस्वास’ (Bob Biswas) दीर्घकाळ चर्चेनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म झी5वर प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊया, कसा आहे अभिषेक बच्चनचा नवा चित्रपट...

Bob Biswas Review : ‘सुपारी किलर’च्या भूमिकेत अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय, वाचा कसा आहे ‘बॉब बिस्वास’...
Abhishek Bachchan
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 5:04 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री चित्रागंदा सिंह (Chitrangada Singh) स्टारर चित्रपट ‘बॉब बिस्वास’ (Bob Biswas) दीर्घकाळ चर्चेनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म झी5वर प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊया, कसा आहे अभिषेक बच्चनचा नवा चित्रपट…

चित्रपटाची कथा

सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बॉब बिस्वास’ या व्यक्तिरेखेचा जन्म त्याच्या 2012 मध्ये आलेल्या ‘कहानी’ चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेतून झाला होता. ‘कहानी’ चित्रपटात अभिनेता शाश्वत चॅटर्जी ‘बॉब’च्या भूमिकेत दिसला होता, पण यावेळी सुजॉय घोषने या व्यक्तिरेखेमागील कथा समोर आणली आहे.

या चित्रपटाची कथा बंगाली बाबू ‘बॉब बिस्वास’ म्हणजेच अभिषेक बच्चन याच्या स्मृती गमावण्यापासून सुरू होते. त्याला पत्नी मेरी म्हणजेच चित्रांगदा आणि मुले देखील आहेत. स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे तो आपले जुने आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी त्याला जीवे अनेकदा मारण्याच्या धमक्या मिळतात. त्याच वेळी, बॉब काही ड्रग्ज माफियांच्या संपर्कात देखील येतो. अशा परिस्थितीत बॉब सर्वकाही विसरून गोंधळून जातो आणि त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येतात.

अभिषेक बच्चनचा उत्कृष्ट अभिनय

अभिषेक बच्चनच्या अभिनयाबद्दल बोलायचे, तर त्याने त्याच्या पात्राला न्याय दिला आहे. बॉबच्या चेहऱ्यावर जी निरागसता आणावी लागली, ती अभिषेकने चांगली साकारली आहे. सिरियल किलरची व्यक्तिरेखा त्याने पडद्यावर उत्तमरित्या साकारली आहे. ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट पूर्णपणे अभिषेक बच्चनचा चित्रपट आहे. पण, कुठेतरी लेखक सुजॉय घोष आणि दिग्दर्शक दिया अन्नपूर्णा घोष यांनी या पात्राला पूर्णपणे न्याय दिला नाही, असे वाटते.

चित्रांगदा सिंहचा अभिनयही वाखाणण्याजोगा!

अभिषेकच्या भूमिकेत आणखी प्रयोग करता आले असते. मात्र, चित्रांगदा सिंहने उत्तम तोल सांभाळून काम केले आहे. नेहमीप्रमाणेच ती तिच्या अभिनयात पुरेपूर मिसळली आहे. चित्रगंदाची भूमिका थोडी वाढवता आली असती, तरी तिचे पडद्यावरचे पुनरागमन प्रभावी आहे. ‘काली दा’ या व्यक्तिरेखेत परण बंदोपाध्याय यांनी उत्तम काम केले आहे.चित्रपटाची पार्श्वभूमी तुम्हाला कलकत्त्याशी पूर्णपणे जोडून ठेवेल. ‘बॉब बिस्वास’ चित्रपटाची गाणी आणि संगीत सरासरी आहे. किशोर कुमारच्या हिट हिंदी गाण्यांमधील बंगाली मूळ गाण्यांचा चित्रपटात चांगला वापर करण्यात आला आहे.

चित्रपट पाहावा की नाही?

जर, तुम्ही विद्या बालनचा ‘कहानी’ चित्रपट पाहिला असेल आणि त्याच्याशी हा चित्रपट जोडण्याचा विचार करत असाल, तर थोडा कंटाळा येईल. पण, जर तुम्ही तो चित्रपट पाहिला नसेल, तर तुम्हाला या चित्रपटात नवेपणा जाणवेल. एकूणच चित्रपट चांगला आहे, आणि तो एकदा आवर्जून पाहावा.

हेही वाचा :

Brahma Mishra Death | मित्रासोबत धमाल डान्स, ‘ललित’ फेम ब्रह्मा मिश्राचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लगीन घटीका समीप आली! अंकिता-विकीच्या लग्न सोहळ्याला सुरुवात!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.