Happy birthday Sanjay Dutt | छोटा भाऊ मानत असूनही संजय दत्त सलमानला ‘घमेंडी’ म्हणाला, ‘या’ कारणामुळे नात्यात वितुष्ट आले!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Harshada Bhirvandekar

Updated on: Jul 29, 2021 | 11:11 AM

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज (29 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण संजय दत्त आणि सलमान खानच्या मैत्रीबद्दल बोलणार आहोत.

Happy birthday Sanjay Dutt | छोटा भाऊ मानत असूनही संजय दत्त सलमानला ‘घमेंडी’ म्हणाला, ‘या’ कारणामुळे नात्यात वितुष्ट आले!
सलमान खान-संजय दत्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज (29 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण संजय दत्त आणि सलमान खानच्या मैत्रीबद्दल बोलणार आहोत. बॉलिवूडच्या ‘बाबा’ची म्हणजेच संजय दत्तची मैत्री आजही बॉलिवूडच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या स्टार्सशी आहे, पण त्यांचा एक जुना आणि सर्वात जवळचा मित्र आता त्याच्यासोबत दिसत नाही. होय, या मित्राचे नाव सलमान खान (Salman Khan) आहे.

सलमान आणि संजयची मैत्री तब्बल 3 दशकं जुनी आहे. बांद्राच्या या दोन्ही मुलांनी त्यांच्या वेळेत ही मैत्री बरीच गाजवली. पण, जेव्हा संजय दत्तची शिक्षा संपली आणि तो तुरूंगातून बाहेर आला, तेव्हा त्याला वाटले की, त्याला घेण्यासाठी सलमान खान तेथे आला असावा, पण तसे झाले नाही. सलमान खान त्याला तुरूंगातही भेटायला गेला नाही.

संजय दत्त तुरुंगातून परत आल्यानंतर त्याच्यासाठी एक छोटासा गेट-टू-गेदर आयोजित करण्यात आला होता. परंतु, सलमान खान तेथेही पोहोचला नाही. सलमान खान आणि संजयचे अनेक जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात, पण या दोघांमधील मैत्री आता दिसत नाही.

संजयने सलमान खानला म्हटले ‘घमेंडी’

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ‘संजू’च्या प्रमोशन दरम्यान संजय दत्तने बरीच दीर्घ मुलाखती दिली होती, या मुलाखतीच्या दरम्यान जेव्हा त्याला सलमान खानबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने सलमान एक अहंकारी व्यक्ती असल्याचे म्हटले होते. असे म्हटले जाते की, सलमान खान आणि संजय यांच्यातील हा वाद रणबीर कपूरमुळे होता. एक काळ असा होता जेव्हा सलमान खान कतरिना कैफला डेट करायचा, त्यानंतर कतरिना रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. यामुळे रणबीर कपूरला संजयच्या बायोपिकमध्ये भूमिका मिळावी अशी सलमान खानची इच्छा नव्हती. ज्यामुळे संजय आणि सलमान यांच्या नात्यात अंतर आले.

सलमान खान छोटा भाऊ मानायचा संजय दत्त!

संजय दत्तने सलमान खानला नेहमीच आपला धाकटा भाऊ मानले आहे. पण संजय दत्त तुरूंगातून बाहेर आला तेव्हापासून सलमान खान त्याला भेटायला आलेला नाही. आता हे दोघेही एकमेकांचा चेहरा पाहू इच्छित नाहीत.

(Happy birthday Sanjay Dutt when actor called Salman khan arrogant)

हेही वाचा :

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राची मित्र-मैत्रिणींसोबत लंडनमध्ये धमाल, सोशल मीडियावर फोटो शेअर

Death Anniversary | कधी काळी बस कंडक्टर म्हणून काम करायचे जॉनी वॉकर, ‘या’ दिग्दर्शकांनी दिला ब्रेक नि बनले सुपरस्टार!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI