Happy Birthday Sunidhi Chauhan | वयाच्या चौथ्या वर्षी मंदिरात गाणी गायला सुरुवात, आजमितीला आघाडीची गायिका बनलीय सुनिधी चौहान!

सध्या आघाडीची यशस्वी पार्श्वगायिका सुनिधी चौहानचा (Sunidhi Chauhan) आज (14 ऑगस्ट) वाढदिवस आहे. वयाच्या 11व्या वर्षी चित्रपटांमध्ये गाणे सुरू करणाऱ्या सुनिधीचा जन्म 1983मध्ये नवी दिल्ली येथे झाला.

Happy Birthday Sunidhi Chauhan | वयाच्या चौथ्या वर्षी मंदिरात गाणी गायला सुरुवात, आजमितीला आघाडीची गायिका बनलीय सुनिधी चौहान!
सुनिधी चौहान

मुंबई : सध्या आघाडीची यशस्वी पार्श्वगायिका सुनिधी चौहानचा (Sunidhi Chauhan) आज (14 ऑगस्ट) वाढदिवस आहे. वयाच्या 11व्या वर्षी चित्रपटांमध्ये गाणे सुरू करणाऱ्या सुनिधीचा जन्म 1983मध्ये नवी दिल्ली येथे झाला. सुनिधी चौहानने आपल्या अनोख्या आवाजाने गायनाच्या जगात खूप नाव कमावले आहे. सुनिधी हे संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. हिंदीशिवाय सुनिधीने मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, पंजाबी, बंगाली, आसामी, नेपाळी आणि उर्दू भाषेतही गाणी गायली आहेत. गायिका व्यतिरिक्त सुनिधी एक फॅशन आयकॉन आहे.

सुनिधीने तिच्या कारकिर्दीला वयाच्या चौथ्या वर्षी सुरुवात केली. सुनिधीचे वडीलही थिएटर आर्टिस्ट होते. लहान वयात सुनिधी स्टेज शो आणि स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. सुनिधीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने प्रथम मंदिरांमध्ये जागरणमध्ये गायले होते. तेथून लोकांना वाटू लागले की, तिने इतर ठिकाणीही गाणी गायली पाहिजेत.

कशी मिळाली संधी?

अभिनेत्री तबस्सुमने एका रिअॅलिटी शो दरम्यान या चिमुकलीची प्रतिभा ओळखली. तबस्सुम यांनी सुनिधीच्या पालकांना तिला मुंबईला घेऊन यायला सांगितले. यानंतर सुनिधी मुंबईत आली आणि दूरदर्शनच्या गायनावर आधारित रिअॅलिटी शो ‘मेरी आवाज सुनो’ स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा जिंकून सुनिधीने ‘लता मंगेशकर करंडक’ जिंकला होता.

येथूनच सुनिधीने संगीताच्या जगात आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. वयाच्या 16व्या वर्षी सुनिधीला चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ‘मस्त’ चित्रपटात संधी मिळाली होती. या चित्रपटाची सर्व गाणी सुपरहिट झाली. 2013मध्ये सुनिधीने आशियातील ‘टॉप 50 कामुक महिलां’मध्ये आपले स्थान निर्माण केले. वास्तविक सुनिधीचे खरे नाव निधी चौहान आहे, परंतु कल्याणजींच्या अकादमीतून बाहेर पडलेल्या सर्वांची नावे ‘एस’ ने सुरू झाली. त्यामुळे निधीचे नाव सुनिधी झाले.

सुनिधीचे वैयक्तिक आयुष्य

सुनिधीला ‘रुकी रुकी सी जिंदगी’ साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सुनिधीने आता 3000हून अधिक गाणी गायली आहेत. सुनिधीची कारकीर्द खूप चांगली गेली, पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार आले. वयाच्या 18व्या वर्षी सुनिधीने दिग्दर्शक बॉबी खानशी लग्न केले, जे तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठे होते. सुनिधीने बॉबीशी लग्न केले आणि ती त्याच्यासोबत राहू लागली. पण एका वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला.

सुनिधीने लग्न मोडल्यानंतर 9 वर्षांनी संगीतकार हितेश सोनिकसोबत लग्न केले. हितेश देखील सुनिधीपेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. हितेश हा सुनिधीचा बालपणीचा मित्र होता. दोघेही 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. 1 जानेवारी 2018 रोजी सुनिधीने तेग नावाच्या मुलाला जन्म दिला.

हेही वाचा :

Kangana Ranaut : कंगनाचा ग्लॅमरस अवतार, नेटकऱ्यांनी करून दिली देव, देश आणि धर्माची आठवण!

अशी स्तुती सचिन खेडेकरांची तोंडावर कुणीच केली नसेल, इन्सपेक्टर बाई म्हणाल्या, मी आल्यापासून तुम्हालाच बघतेय, बघा खेडेकरांची प्रतिक्रिया

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI