Sanjay Dutt: संजय दत्तला सोडून पत्नी, मुलं दुबईत का राहताहेत? अखेर समोर आलं कारण

Sanjay Dutt: संजय दत्तला सोडून पत्नी, मुलं दुबईत का राहताहेत? अखेर समोर आलं कारण
Sanjay Dutt with family
Image Credit source: Instagram

संजय आणि मान्यताला शाहरान आणि इक्रा ही दोन जुळी मुलं असून ते आता 11 वर्षांचे आहेत. पत्नी आणि मुलं दुबईत राहत असताना संजू बाबा मात्र मुंबईत एकटाच राहतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजयने यामागचं कारण सांगितलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 15, 2022 | 10:05 AM

अभिनेता संजय दत्तची (Sanjay Dutt) पत्नी मान्यता दत्त (Maanayata Dutt) आणि त्यांची दोन मुलं हे गेल्या दोन वर्षांपासून दुबईत (Dubai) राहत आहेत. संजय आणि मान्यताला शाहरान आणि इक्रा ही दोन जुळी मुलं असून ते आता 11 वर्षांचे आहेत. पत्नी आणि मुलं दुबईत राहत असताना संजू बाबा मात्र मुंबईत एकटाच राहतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजयने यामागचं कारण सांगितलंय. त्याचप्रमाणे मुलांना तिथे खूश राहताना पाहणं हे माझं प्राधान्य असल्याचंही त्याने म्हटलंय. संजय दत्त आणि मान्यताने 2008 मध्ये लग्नगाठ बांधली. 2010 मध्ये मान्यताने जुळ्या मुलांना जन्म दिला. पहिल्या लॉकडाउनपूर्वी 2020 मध्ये मान्यता मुलांसह दुबईला राहायला गेली आणि तेव्हापासून ते तिथेच राहत आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त म्हणाला, “माझी मुलं तिथे शिकतायत याचा मला आनंद आहे. माझी पत्नी मान्यतासुद्धा तिथे तिचं काम करतेय. माझं जेव्हा शूटिंगचं शेड्युल नसतं, तेव्हा मी पत्नी, मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी तिथे जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मुलांसोबत वेळ घालवणार आहे. ते जिथे जातील, तिथे मी त्यांच्यासोबत जाईन.”

पहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

“माझी मुलं इथे राहू शकली असती, पण ते दोघं तिथे जास्त रमले आहेत. त्यांना तिथे राहणं आवडतंय. त्यांना त्यांची शाळा आणि इतर अॅक्टिव्हिटिज आवडतायत. माझी पत्नीसुद्धा तिथे तिचा व्यवसाय करतेय. हे सर्व आपोआपच घडलं. यामागे आमचा कुठलाही प्लॅन नव्हता. मान्यता दुबईत तिचा व्यवसाय करत होती. तिला वाटलं तिथे जाऊन राहावं आणि व्यवसाय सांभाळावा. त्यामुळे तिच्यासोबत मुलंसुद्धा गेली”, असं त्याने सांगितलं.

संजय दत्त तुरुंगात असताना आणि त्यानंतर कॅन्सरशी झुंज देतानाही पत्नी मान्यताने त्याची खंबीर साथ दिली. अनेकदा संजय दत्त पत्नी आणि मुलांविषयी मुलाखतींमध्ये मोकळपणाने व्यक्त होतो. ईदनिमित्त संजय पत्नी आणि मुलांना भेटायला दुबईला गेला होता. यावेळी त्याने सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला होता.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें