‘बोलो बॉलीवुड बाइसेप्स की जय’ म्हणत फिटनेसफ्रिक हृतिक रोशनने शेअर केला सुपर कूल फोटो, तुम्ही पाहिलात का?

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशन (Hrithik Roshan) आपल्या लूकमुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीपासून आजपर्यंत त्याची फिटनेस आणि अॅक्शन प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. यामुळेच अभिनेत्याच्या एका पोस्टवर चाहत्यांच्या हजारो प्रतिक्रिया दिसू लागतात.

'बोलो बॉलीवुड बाइसेप्स की जय' म्हणत फिटनेसफ्रिक हृतिक रोशनने शेअर केला सुपर कूल फोटो, तुम्ही पाहिलात का?
हृतिक रोशन

मुंबई : बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशन (Hrithik Roshan) आपल्या लूकमुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीपासून आजपर्यंत त्याची फिटनेस आणि अॅक्शन प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. यामुळेच अभिनेत्याच्या एका पोस्टवर चाहत्यांच्या हजारो प्रतिक्रिया दिसू लागतात. अलीकडेच त्याने आपला नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा ‘फायटर’ लूक समोर आला आहे. अभिनेता हृतिक रोषण त्याच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी, त्याने त्याच्या शरीरावर विशेष लक्ष दिले आहे, जे फोटोमध्ये दिसत आहे. त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो

हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्याने त्याच्या ‘फायटर’ या नवीन चित्रपटातील त्याची शरीरयष्टी दाखवली आहे. पोस्ट शेअर करताच त्यावर चाहत्यांची लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळत आहे. लोक या पोस्टचे खूप कौतुक करत आहेत, कारण अभिनेता या पोस्टद्वारे आपले बायसेप्स दाखवत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बॉलीवुड बायसेप्स की जय बोला.’ अनेक चाहत्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट बघून चाहते आता त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत, ज्यात त्यांना अभिनेत्याच्या बायसेप्ससह अॅक्शन पाहण्याची संधी मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

हृतिक रोशनने दाखवल्या ‘बॉलिवूड बायसेप्स’

इंस्टाग्रामवरील आपल्या पोस्टमुळे हृतिक खूप चर्चेत आहे. केवळ चाहतेच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्सनीही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. ज्यात रणवीर सिंग, टायगर श्रॉफ यांनी कमेंट करण्यास अजिबात विलंब केलेला नाही. एवढेच नाही तर, त्याची माजी पत्नी सुझान खाननेही टिप्पणी केली. दरम्यान, टायगरने फायर इमोजीसह हृतिकच्या पोस्टचे कौतुक केले, तर रणवीरने ‘कडक’ म्हणत कमेंट केली आहे. तथापि, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे सुझानची कमेंट, जिने “wowzer !!” असे म्हणत त्याचे कौतुक केलेय.

नुकतीच शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

अभिनेता हृतिक रोशन व्यस्त वेळापत्रकामध्ये देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे. अलीकडेच त्याने त्याचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. यासह, तो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चित्रपटांशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करतात. आधीच्या पोस्टबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याने त्याच्या स्टोरीवर लिहिले होते की, ‘अॅक्शनसाठी तयार राहा’ आणि ‘होय, पुढे जा आणि मला ठोसा मारा.’ हृतिक रोशन शेवट ‘वॉर’ या अॅक्शन चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘फायटर’ हा चित्रपट देखील एक वॉर अॅक्शन चित्रपट असणार आहे आणि दीपिका पदुकोण त्यात हृतिकसोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

कधी चित्रपटाचा सेट तर कधी डेट, ‘अशी’ होती तुमच्या लाडक्या बॉलिवूडकरांची अन् त्यांच्या जोडीदारांची पहिली भेट!

Happy Birthday Radhika Apte: परदेशी व्यक्तीशी गुपचूप लग्न , ‘या’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा अभिनेत्री राधिका आपटेबद्दल…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI