कधी चित्रपटाचा सेट तर कधी डेट, ‘अशी’ होती तुमच्या लाडक्या बॉलिवूडकरांची अन् त्यांच्या जोडीदारांची पहिली भेट!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 07, 2021 | 9:05 AM

बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद होतो. या जोडप्यांची प्रेमकथा देखील चाहत्यांना ‘कपल गोल’ देते. पडद्यावर रोमान्स करणाऱ्या या हिरो हिरोईनच्या खऱ्या आयुष्यातील पहिल्या भेटीची गोष्ट जेव्हा समोर येते, तेव्हा ती आणखी रंजक बनते.

कधी चित्रपटाचा सेट तर कधी डेट, ‘अशी’ होती तुमच्या लाडक्या बॉलिवूडकरांची अन् त्यांच्या जोडीदारांची पहिली भेट!
Bollywood Celebs

Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद होतो. या जोडप्यांची प्रेमकथा देखील चाहत्यांना ‘कपल गोल’ देते. पडद्यावर रोमान्स करणाऱ्या या हिरो हिरोईनच्या खऱ्या आयुष्यातील पहिल्या भेटीची गोष्ट जेव्हा समोर येते, तेव्हा ती आणखी रंजक बनते. अनेक बॉलिवूड स्टार्सची प्रेमकथा अशीच काहीशी आहे आणि त्यांच्या पहिल्या भेटीची कथा तर आणखी रोचक आहे. चला तर, जाणून घेऊया अशाच काही प्रसिद्ध जोडप्यांच्या प्रेमकथेबद्दल…

अक्षय कुमार – ट्विंकल खन्ना

अक्षय कुमारचे नाव बॉलिवूडच्या अनेक नायिकांशी जोडले गेले होते, पण जेव्हा अक्षयने ट्विंकलला पाहिले तेव्हा तो पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडला. वास्तविक, अक्षयने पहिल्यांदाच फिल्मफेअरच्या शूटमध्ये ट्विंकलला पाहिले होते आणि पहिल्या दृष्टीक्षेपातच तो प्रेमात पडला होता. यानंतर अक्षय आणि ट्विंकल अनेक वेळा एकमेकांना भेटले आणि अक्षयने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ट्विंकल त्या दिवसात चित्रपट ‘मेला’मध्ये काम करत होती. ती म्हणाली की, जर हा चित्रपट फ्लॉप झाला तर ती त्याच्याशी लग्न करेल. आजघडीला अक्षय आणि ट्विंकल बॉलिवूडच्या यशस्वी जोडप्यांपैकी एक आहेत.

प्रियंका चोप्रा – निक जोनास

प्रियंका आणि निक दोघांनाही कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. ही जोडी त्यांच्या एका कॉमन मित्राद्वारे एकमेकांना भेटली. यानंतर निकने प्रियांकाला मेसेज केला की, त्याला तिला भेटायचे आहे, त्यावर प्रियांका म्हणाली, ‘माझी टीम हा मेसेज वाचू शकते, तू मला टेक्स्ट मेसेज का पाठवत नाहीस’. यानंतर दोघांची भेट झाली आणि प्रियांका निक एकमेकांच्या प्रेमात पडले.

शाहरुख – गौरी

शाहरुख पडद्यावर त्याच्या रोमान्ससाठी ओळखला जातो आणि त्याला त्याच्या वास्तविक जीवनातून कुठेतरी त्याची प्रेरणा मिळाली आहे. वास्तविक, जेव्हा शाहरुख 18 वर्षांचा होता, तेव्हा त्याची नजर एका पार्टीत गौरीवर पडली. 14 वर्षांच्या गौरीला पाहून शाहरुखला प्रेमात असल्यासारखे वाटले. यानंतर, दोघे पंचशीला क्लबमध्ये पहिल्यांदा एका डेटसाठी भेटले. शाहरुख आणि गौरी यांच्यात धर्माचा फरक होता, पण त्यांचे प्रेम खरे होते, म्हणून कुटुंबाने सहमती दर्शवली. आता त्यांच्या लग्नाला 30 वर्षांहून अधिक काळ झाला आहे.

सैफ अली खान – करीना कपूर

सैफ आणि करीना आज बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानले जातात. करीना सैफपेक्षा खूपच लहान आहे. सैफ करिश्मासोबत काम करायचा जेव्हा करीना सेटवर येत असे, जिथे हे दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर दोघांनी ‘टशन’च्या आधी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. हळूहळू सैफ आणि करीनाला समजले की हे नाते केवळ डेटिंगपर्यंत टिकू शकत नाही, त्यानंतर त्यांनी लग्न केले. आज दोघेही दोन सुंदर मुलांचे पालक आहेत.

रणबीर आणि आलिया

रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत आणि त्यांच्या प्रेमकथेची चर्चा या चित्रपटाच्या सेटवरुन सुरु झाली आहे. मात्र, या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले नाहीत. आलिया आणि रणबीर ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या सेटवर भेटले, जेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती आणि रणबीर संजय लीला भन्साळींना सहाय्य करत होता. रणबीर लहानपणापासूनच आलियाचा क्रश होता आणि जर सर्व काही ठीक झाले तर दोघेही लवकरच लग्न करतील.

रणवीर आणि दीपिका

रणवीर आणि दीपिका बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जातात. दोघांचे लग्नही अतिशय भव्य पद्धतीने पार पडले. दीपिकाने सांगितले होते की, तिची आणि रणवीरची पहिली भेट यशराजच्या स्टुडिओमध्ये झाली होती. दीपिकाला बघताच रणवीर तिच्या प्रेमात पडला होता. त्या काळात तो दुसऱ्या कुणाला डेट करत होता पण दीपिकासोबत त्याचे फ्लर्टिंग कमी होत नव्हते. हळूहळू रणवीरच्या प्रेमात दीपिका आकंठ बुडाली आणि दोघांनी लग्न केले.

हेही वाचा :

Leander Paes Kim Sharma Affair | लिएंडर पेससोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब, अभिनेत्री किम शर्माने शेअर केला रोमँटिक फोटो

Kokancha Ganpati : सागरिका म्युझिकने आणलाय ‘कोकणचा गणपती’, पाहा या खास म्युझिक व्हिडीओचा टीझर

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI