AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Huma Qureshi | हुमा कुरेशी चक्क अनुराग कश्यप विरोधात गुन्हा दाखल करणार, वाचा काय घडले?

काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप यांनी म्हटले होते की, कांतारा आणि पुष्पा यासारख्या चित्रपटांमुळे बाॅलिवूडचे (Bollywood) नुकसान होत आहे. यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

Huma Qureshi | हुमा कुरेशी चक्क अनुराग कश्यप विरोधात गुन्हा दाखल करणार, वाचा काय घडले?
| Updated on: Jan 14, 2023 | 4:33 PM
Share

मुंबई : हुमा कुरेशी आणि अनुराग कश्यप यांची केमिस्ट्री सर्वांनाच माहिती आहे. २०१२ मध्ये अनुराग कश्यप यांनीच हुमा कुरेशी हिला लाॅन्च केले आहे. मात्र, आता चक्क हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिने अनुराग कश्यपवर चोरीचा आरोप करत सर्वांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून हुमा कुरेशी ही बाॅलिवू़डमधील एक चर्चेतील नाव आहे. अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री यांच्यामधील वाद सर्वांनाच माहिती आहे. काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप यांनी म्हटले होते की, कांतारा आणि पुष्पा यासारख्या चित्रपटांमुळे बाॅलिवूडचे (Bollywood) नुकसान होत आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी चांगलाच समाचार घेत अनुराग कश्यप यांना खडेबोल सुनावले होते.

आता हुमा कुरेशी हिने इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केल्याने अनुराग कश्यप चर्चेत आले आहे. हुमा कुरेशी हिने ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बतची एक क्लिप शेअर करत लिहिले की, माझे गाणे चोरल्याबद्दल मी अमित त्रिवेदी आणि अनुराग कश्यप यांच्यावर खटला दाखल करत आहे.

Anurag Kashyap

हुमा कुरेशी हिच्या या पोस्टनंतर अनेक चर्चांना उधाण आले आणि नेमके काय घडले हे चाहते विचारत होते. याचदरम्यान आता अनुराग कश्यप यांनी हुमा कुरेशी हिची ही पोस्ट रिशेअर करत म्हटले की, हाहाहा…ते कधीही सोडू नका…तसेच यासोबत अनुराग कश्यप याने काही इमोजीही शेअर केले आहेत.

आता अनुराग कश्यप यांच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, हुमा कुरेशी आणि अनुराग कश्यप हे दोघे मजाक करत होते. आता ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. हुमा कुरेशी ही तिच्या दबंग अभिनयासाठी ओळखली जाते. हुमा आणि अनुराग कश्यप यांची पहिली भेट एका जाहिरातीदरम्यान झाली होती.

अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री यांच्यामध्ये कायमच सोशल मीडियावर एक प्रकारचा वाॅर सुरू असतो. अनुराग कश्यप यांनी काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांच्याविरोधात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यावरून चाहते अनुराग कश्यप यांनाच टार्गेट करत होते.हुमा कुरेशी ही कायमच अनुराग कश्यप यांच्या सपोर्टमध्ये असते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच