AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant | राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांचा लिपलॉक व्हिडीओ तूफान व्हायरल

मी नेमक्या कोणत्या परिस्थिती लग्न केले हे मी दहा दिवसांमध्ये सांगेल. म्हणजेच आता आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिच्यासोबतच्या लग्नाला नकार देतोय.

Rakhi Sawant | राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांचा लिपलॉक व्हिडीओ तूफान व्हायरल
| Updated on: Jan 14, 2023 | 3:47 PM
Share

मुंबई : राखी सावंत आणि आदिल दुर्रानी सध्या चर्चेत आहेत. राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिल दुर्रानी यांचे सात महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. परंतू आदिल दुर्रानी याने सर्वांपासून लग्नाची गोष्ट पुढच्या एक वर्षापर्यंत लपवण्यास सांगितले होते. परंतू इंस्टा स्टोरीवर राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. हे फोटो पाहून चाहते राखीचे अभिनंदन करताना दिसत आहेत. मात्र, आदिल दुर्रानी याने सर्वांनाच मोठा धक्का देत म्हटले की, हे लग्न मी स्वीकारू शकत नाही आणि मान्य देखील करू शकत नाही. मी नेमक्या कोणत्या परिस्थिती लग्न केले हे मी दहा दिवसांमध्ये सांगेल. म्हणजेच आता आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिच्यासोबतच्या लग्नाला नकार देतोय.

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी त्यांच्या लग्नामुळे चर्चेत असतानाच यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत आणि आदिल लिपलॉक करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये राखी आणि आदिल फोटोशूट करताना दिसत आहेत. आता या व्हिडीओवर युजर्स कमेंट करत राखी आणि आदिल यांना ट्रोल करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटले की, पाहा ही इस्लामची शहजादी..

राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर धर्म चेंज केला असून आता राखीचे नाव फातिमा असल्याचे स्वत: राखी हिने सांगितले आहे. इतकेच नाहीतर लग्न केल्याचे का जाहिर केले हे देखील राखीने सांगून टाकले आहे.

राखी म्हणाली की, मी बिग बाॅस मराठीमध्ये जाण्याच्या अगोदर सर्वकाही ठिक होते. परंतू मी बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यानंतर बऱ्याच गोष्टीमध्ये मला बदल दिसले. यामुळे मी लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.

आदिल दुर्रानी माझ्यावर नाराज आहे. कारण पुढचे एक वर्ष लग्नाबद्दल कोणालाच सांगायचे नव्हते. माझ्या आणि आदिलच्या प्रेमामध्ये धर्म कधीच येऊ शकत नाही. आम्ही अगोदर कोर्ट मॅरेज केले आणि नंतर निकाह केला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच