AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्फी जावेद हिला मुंबई पोलिसांची नोटीस; चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलिसांनी घेतली दखल

उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होणार? चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलिसांनी घेतली दखल, मॉडेलला पोलिसांनी पाठवली नोटीस

उर्फी जावेद हिला मुंबई पोलिसांची नोटीस; चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलिसांनी घेतली दखल
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 14, 2023 | 10:39 AM
Share

मुंबई : मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात होणार उर्फी जावेदची चौकशी उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली आहे. आज उर्फीला चौकशीसाठी हजर रहायचं आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. शुक्रवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेतला. ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी एक ट्विट करत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, असं म्हणत उर्फीच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर उर्फीने देखील चित्रा वाघ यांच्या ट्विटरच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं. एवढंच नाही, तर मॉडेलने चित्रा वाघ यांना ट्विट करत डिवचण्याचा प्रयत्न केला.

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी उर्फी जावेद हिच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहेत. दरम्यान उर्फीने शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.