AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझ्या आईने ती बातमी पाहिली असती तर तिला हार्ट अटॅकच आला असता”; फरदीन खानने सांगितला अनुभव

सोशल मीडियावर एखादं वृत्त किंवा माहिती वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होते. मात्र याचा अनेकदा सेलिब्रिटींना मोठा फटका बसतो. त्यांच्या अफेअर्सपासून ते अगदी निधनापर्यंतच्या अफवा सोशल मीडियावर क्षणार्धात पसरवल्या जातात. अशा अनेक सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा (fake reports) आजवर सोशल मीडियावर पसरल्या आहेत.

माझ्या आईने ती बातमी पाहिली असती तर तिला हार्ट अटॅकच आला असता; फरदीन खानने सांगितला अनुभव
Fardeen KhanImage Credit source: Facebook
| Updated on: Mar 25, 2022 | 4:07 PM
Share

सोशल मीडियावर एखादं वृत्त किंवा माहिती वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होते. मात्र याचा अनेकदा सेलिब्रिटींना मोठा फटका बसतो. त्यांच्या अफेअर्सपासून ते अगदी निधनापर्यंतच्या अफवा सोशल मीडियावर क्षणार्धात पसरवल्या जातात. अशा अनेक सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा (fake reports) आजवर सोशल मीडियावर पसरल्या आहेत. असाच अनुभव अभिनेता फरदीन खानला (Fardeen Khan) आला. एकदा नव्हे तर दोनदा त्याच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावरून पसरल्या होत्या. एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी होती. अशी खोटी बातमी जेव्हा कुटुंबीय किंवा मित्र वाचतील, तेव्हा त्यांना काय वाटेल याबाबत तो व्यक्त झाला. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत फरदीनने फेक न्यूजबद्दल संताप व्यक्त केला. (death hoax)

“माझा अपघातात मृत्यू झाला अशा अफवा दोनदा पसरवल्या गेल्या होत्या. ते वाचून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्या आईने ती बातमी पाहिली किंवा वाचली असती तर तिला हार्ट अटॅकच आला असता. माझ्या पत्नीपर्यंत किंवा मित्रमैत्रिणींपर्यंत ती फेक न्यूज पोहोचली असती तर काय झालं असतं, याचा विचारच करू शकत नाही मी. अर्जुन रामपालने मला मेसेज करून विचारलं होतं की मी ठीक आहे का? मी जिवंत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याने तो मेसेज केला असावा”, असं त्याने सांगितलं.

फरदीन खान बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात फरदीनने सुष्मिता सेनसोबत काम केलं होतं. त्यानंतर आता तो हॉरर ड्रामा ‘विस्फोट’मध्ये झळकणार आहे. यामध्ये रितेश देशमुख, प्रिया बापट, क्रिस्टल डिसूझा यांच्याही भूमिका आहेत. गेल्या महिन्यात या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली. कुकी गुलाटी दिग्दर्शित हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉक, पेपर अँड सिझर्स’ या व्हेनेझुएलन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

हेही वाचा:

RRR Review in Marathi: राजामौली.. सिर्फ नाम ही काफी है! रामचरण-ज्युनियर एनटीआरची ‘पॉवरपॅक्ड’ जुगलबंदी

विवेक अग्निहोत्री पुन्हा वादात, म्हणतात “भोपाळी” म्हणजे समलैंगिक, तर दिग्विजय सिंह म्हणतात हा संगतीचा परिणाम…

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.