Video : यालाच तर म्हणतात निरागसपणा, पाहा जहांगीर अली खानचा व्हायरल होणारा खास व्हिडीओ…
मुंबई : करीना कपूर आणि सैफ अली खानचा लहान मुलगा जहांगीर सैफ अली खानचा (Jehangir Saif Ali Khan) एक क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये जहांगीरचा निरागसपणा स्पष्ट दिसत आहे. जहांगीरला पैपराजीकडे जायचे आहे, त्यासाठी तो जिद्द करताना दिसतोय. हा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर अनेकांना आवडला असून लहानपण असेच असते, असे […]

मुंबई : करीना कपूर आणि सैफ अली खानचा लहान मुलगा जहांगीर सैफ अली खानचा (Jehangir Saif Ali Khan) एक क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये जहांगीरचा निरागसपणा स्पष्ट दिसत आहे. जहांगीरला पैपराजीकडे जायचे आहे, त्यासाठी तो जिद्द करताना दिसतोय. हा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर अनेकांना आवडला असून लहानपण असेच असते, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. जहांगीरच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तूफान व्हायरल होतो आहे.
इथे पाहा जहांगीर अली खानचा व्हायरल होणारा व्हिडीओ
View this post on Instagram
पाहा जहांगीर अली खानचा निरागसपणा…
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा…लहानपणी माणूस निरागस असतो. जहांगीरचा हा खास व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूर आता फोटोंबद्दल फारसा उत्साही दिसत नाही. बऱ्याच वेळा फोटोग्राफरला बघून तैमूर चिडतो देखील त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, तैमुरच्या लहान भावाने जे कृत्य केले आहे, ते पाहून प्रत्येकालाच मोठे आर्श्चय वाटले.
जहांगीरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल
जहांगीरला पैपराजीकडे जायचे होते हे व्हिडीओमध्ये दिसते आहे. मात्र, केअरटेकर जहांगीरला जाऊ देत नसल्याने तो जिद्द करतो आणि केअरटेकरचा हात सोडून बाजूला जात पैपराजीकडे बघत खाली बसतो. त्यानंतर केअरटेकर त्याला उचलून घेऊन जाते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला असून या व्हिडीओमधून जहांगीरचा निरागसपणा दिसून येतो आहे.
