जान्हवी कपूर हिचे हे फोटो पाहून चढला नेटकऱ्यांचा पारा, ट्रोलर्स थेट म्हणाले, श्रीदेवी जिवंत असत्या तर…

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

जान्हवी कपूर हिचे हे फोटो पाहून चढला नेटकऱ्यांचा पारा, ट्रोलर्स थेट म्हणाले, श्रीदेवी जिवंत असत्या तर...
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 7:29 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसली होती. जान्हवी कपूर हिच्या मिली या चित्रपटाची निर्मिती तिचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांनीच केली. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाका करण्यात यश मिळाले नाही. जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट फ्लाॅप गेलाय. आता जान्हवी कपूर हिला एका साऊथच्या मोठ्या अभिनेत्यासोबत बिग बजेटच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळालीये.

विशेष म्हणजे जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी जान्हवी कपूर ही बोल्ड फोटो कायमच शेअर करते. जान्हवी कपूर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. जान्हवी कपूर ही सध्या मालदीवमध्ये आहे. मालदीवमधून अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना जान्हवी कपूर दिसत आहे.

जान्हवी कपूर हिने गुलाबी रंगाच्या बिकिनीवरील काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवी कपूर हिचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अनेकांना जान्हवी कपूर हिचा हा लूक आवडला नाहीये. या फोटोमुळे सध्या जान्हवी नेटऱ्यांच्या निशाण्यावर असून अनेकांनी तिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये.

एका युजर्सने जान्हवी कपूर हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, किती भारी आहे ना…आईच्या नावाने प्रसिध्द व्हायचे किंवा थेट बॉडी दाखवून चित्रपट मिळवायचे. दुसऱ्याने लिहिले की, तू कितीही प्रयत्न केले तरी तू काइली जेनर होऊ शकत नाही. तिसऱ्याने लिहिले की, जर श्रीदेवी जिवंत असत्या तर त्यांना हे पाहून किती वाईट वाटले असते….

जान्हवी कपूर ही ज्युनियर एनटीआरसोबत काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये जान्हवी कपूर ही हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिसत होती. जान्हवी कपूर ही एनटीआर 30 चित्रपटात ज्युनियर एनटीआर याच्यासोबत काम करणार आहे. ज्युनियर एनटीआरसोबत काम करणे आपले स्वप्न असल्याचे देखील जान्हवी हिने म्हटले होते. विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोही तिने शेअर केले होते.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.