Kajol खरंच तिसऱ्यांचा प्रेग्नंट आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य..

Kajol खरंच तिसऱ्यांचा प्रेग्नंट आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य..
Kajol
Image Credit source: Instagram

अभिनेत्री काजोलने (Kajol) नुकतीच निर्माते अपूर्वा मेहताच्या 50वा वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. मुंबईतच या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी काजोलने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर बॉडकॉन ड्रेस परिधान केला होता.

स्वाती वेमूल

|

Mar 20, 2022 | 3:18 PM

अभिनेत्री काजोलने (Kajol) नुकतीच निर्माते अपूर्वा मेहताच्या 50वा वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. मुंबईतच या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी काजोलने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर बॉडकॉन ड्रेस परिधान केला होता. पापाराझींनी तिचे या लूकमधले फोटो काढले आणि हे फोटो, व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले. काहींनी तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं, तर काहींना हा व्हिडीओ पाहून वेगळाच प्रश्न पडला. काजोल तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे की काय, असा प्रश्न काहींनी या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारला. याच कमेंट्समुळे तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत. (Kajol Pregnancy Rumours)

इव्हेंटमधील एका व्हिडिओमध्ये, काजोल पार्टीत सहभागी झाल्यानंतर तिच्या कारकडे चालत जाताना दिसत आहे. पापाराझी तिला होळीच्या शुभेच्छा देत असताना, ती हसते आणि त्यांना हात दाखवून पुढे जाते. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या फॅशन सेन्सवरही टीका केली आहे. काजोलविरोधात कमेंट्स येताच तिच्या चाहत्यांनी उत्तर देत तिचा बचाव केला. तुमची नेमकी काय समस्या आहे? तिचं वजन वाढलेलं नाही. तुम्हाला काय अडचण आहे?, असं एकाने लिहिलंय. तर जगा आणि जगू द्या असं दुसऱ्याने म्हटलंय. ती तिच्या शरीराबद्दल कम्फर्टेबल आहे याचं कौतुक करायला हवं, असंही काहींनी म्हटलं. एका कमेंटमध्ये असंही लिहिलं आहे की, “तिचं पोट लपविण्यासाठी कॉर्सेट किंवा बॉडी शेपवेअर न घालता तिने तिच्या पसंतीचे कपडे परिधान केले आहेत. ती प्रेग्नंट आहे का असा प्रश्न विचारण्यापेक्षा तिचं कौतुक करा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गेल्या वर्षी काजोल नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘त्रिभंगा’मध्ये झळकली होती. ज्यामध्ये मिथिला पालकर आणि तन्वी आझमी यांच्यादेखील भूमिका होत्या. सध्या ती रेवतीच्या आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात काम करत आहे. चित्रपटाची घोषणा ऑक्टोबर 2021 मध्ये करण्यात आली.

हेही वाचा:

येडा झाला का अनिरुद्ध? अरुंधती जोगळेकरच्या घरात देशमुख लपूनछपून करतोय काय? यश झोडपणार?

The Kashmir Files समोर Akshay Kumarचीही जादू चालेना; जाणून घ्या ‘बच्चन पांडे’ची कमाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें