Aai Kuthe Kay Karte: येडा झाला का अनिरुद्ध? अरुंधती जोगळेकरच्या घरात देशमुख लपूनछपून करतोय काय? यश झोडपणार?

Aai Kuthe Kay Karte:  येडा झाला का अनिरुद्ध? अरुंधती जोगळेकरच्या घरात देशमुख लपूनछपून करतोय काय? यश झोडपणार?
Aai Kuthe Kay Karte
Image Credit source: Hotstar

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा एक तासाचा महाएपिसोड रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. होळी आणि धुळवडीची धमालही या मालिकेत पहायला मिळाली. आशुतोष केळकरने (Ashutosh) अरुंधतीबद्दलचं (Arundhati) व्यक्त केलेलं प्रेम अनिरुद्धला अजूनही पचनी पडत नाहीये.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Mar 20, 2022 | 2:21 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा एक तासाचा महाएपिसोड रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. होळी आणि धुळवडीची धमालही या मालिकेत पहायला मिळाली. आशुतोष केळकरने (Ashutosh) अरुंधतीबद्दलचं (Arundhati) व्यक्त केलेलं प्रेम अनिरुद्धला अजूनही पचनी पडत नाहीये. म्हणूनच तो इतर कुटुंबीयांनाही त्या दोघांपासून लांब राहण्याचा सल्ला देतोय. आशुतोष हळूहळू माझ्या कुटुंबीयांच्या जवळ येऊन त्यांच्या आयुष्यात माझी जागा घेणार, माझ्या मुलांचा तो पिता होण्याचा प्रयत्न करणार, अशी भीती त्याला सतावतेय. म्हणूनच ईशाला तो आशुतोष आणि अरुंधतीसोबत फिरायला जाण्यास साफ नकार देतो. या महाएपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध हा अरुंधतीच्या घरी चोरून येतो. पण असं चोरून जाण्यामागचा त्याचा नेमका काय उद्देश आहे, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती होळीचा आनंद लुटते. तिला पाहून यशसुद्धा खूश होतो. “तुला जे काही करायचं आहे, ते कर. तुझी बकेट लिस्ट तू तयार कर”, असं तो तिला सांगतो. त्यानंतर विचार करून अरुंधतीसुद्धा डायरी लिहायला सुरुवात करते. रोज काहीतरी लिहायचं आणि वाचायचं, असं ती ठरवते. इथे आधीच अस्वस्थ असलेल्या अनिरुद्धचे कान संजना भरते. “अरुंधती आणि आशुतोष या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी भावना आहेत आणि आता तर अरुंधती एकटी राहते. मी एकटी राहत असताना तू किती वेळा यायचास. अरुंधतीला तर पूर्ण मोकळीक आहे. आशुतोष तर सारखा तिच्याकडे जात असणार. काय माहित राहतही असेल तिथे,” असं ती म्हणते. हे ऐकून अनिरुद्धच्या मनात आणखी प्रश्न निर्माण होतात.

इथे अरुंधतीला अजूनही नवीन जागेची तेवढी सवय झालेली नाही. गॅस बंद केला की नाही हे तपासताना ती दार बंद करणं विसरते. आशुतोष आणि अरुंधतीच्या जवळ येण्याने अस्वस्थ झालेला अनिरुद्ध अखेर उठून अरुंधतीच्या घरी लपूनछपून जातो. यापुढे नेमकं काय होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यश आणि अरुंधती त्याला रंगेहाथ पकडतात. त्यामुळे अनिरुद्ध काय कारण या दोघांना सांगणार, हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

हेही वाचा:

The Kashmir Files समोर Akshay Kumarचीही जादू चालेना; जाणून घ्या ‘बच्चन पांडे’ची कमाई

गोध्रा, जीएसटी, नोटाबंदीची आठवण करून देत प्रकाश राज यांचा टोला; The Kashmir Filesवर साधला निशाणा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें