AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : कंगना म्हणाली, बाबा रामदेव माझ्या बेडरूममध्ये उलटे लटकलेले होते का?

कंगना राणावतने रामदेव बाबांवर जोरदार हल्ला चढवला आहे. रामदेव बाबांच्या 'जवानी'वरील टीकेला सडेतोड उत्तर देत कंगनाने त्यांना 'बेडरूममध्ये वटवाघूळासारखे' लटकल्याचा प्रश्न विचारला. सनातनी विचारधारा आणि भांडवलशाहीतील विरोधाभास मांडत, कंगनाने बाबा रामदेव अंडरगार्मेंट्स विकत असल्याने त्यांच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश केला.

Kangana Ranaut : कंगना म्हणाली, बाबा रामदेव माझ्या बेडरूममध्ये उलटे लटकलेले होते का?
Kangana RanautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 4:00 PM
Share

अभिनेत्री आणि भाजपची खासदार कंगना राणावत आणि योगगुरू रामदेव बाबा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. कंगना राणावतने तर रामदेव बाबांची उरलीसुरली सर्वच काढली आहे. कंगनाने जंतरमंतरवरील आंदोलन करणाऱ्यांना जेनजींना गटर जनरेशन म्हटलं होतं. त्यानंतर रामदेव बाबांनी कंगनावर पर्सनल कमेंट केली होती. त्यामुळे कंगना चांगलीच दुखावली गेली असून तिने रामदेव बाबांची चांगलीच काढली आहे. माझी जवानी पाहण्यासाठी बाबा रामदेव काय माझ्या बेडरूममध्ये वटवाघळासारखे उलटे टकलेले होते का? अशा शब्दात कंगनाने रामदेव बाबांचा समाचार घेतला आहे.

रामदेव बाबा आणि कंगना राणावतमधील वाद काही केल्या संपताना दिसत नाहीये. डीडी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने पुन्हा एकदा रामदेवबाबांवर निशाना साधला आहे. रामदेवबाबांची जेव्हा स्वदेशी चळवळ सुरू झाली होती, तेव्हा सरकारनेही त्यांना पाठबळ दिलं होतं. मला वाटतं आता रामदेवबाबा कॅपिटेलिज्ममध्ये खूपच गुंतले आहेत. सनातनी विचारधारा तर भांडवलशाहीशी क्लॅश करते. रामदेव बाबा भांडवलदार झाले आहेत. त्यांनी लोकांची जमीन हडप केली आहे. लोक आक्रोश करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात फटकारलं आहे. त्यांना आर्युर्वेद, जडीबुटी, औषधी, योगपासून प्रेरणा मिळाली होती. पण आता ते बनियान, अंडरगार्मेंट्स यात भांडवल शोधत आहेत. ते पूर्णपणे व्यावसायिक झाले आहेत, असा हल्ला कंगनाने चढवला.

अंडरगार्मेंट्स सनातनी आहे काय?

रामदेव बाबा उद्योगपती झाले यावर काहीच हरकत नाहीये. पण मग तुम्ही सनातनी वस्त्र घालू नये. रामदेवबाबा ज्या बनियान आणि अंडरगार्मेंट्स विकत आहेत, त्या सनातनी आहेत काय? त्यात त्यांचं ढोंग आणि दांभिकता दिसत आहे. रामदेवबाबांसारखे लोक सनातनींना अपमानित करणार असेल तर कोण सहन करेल?, असा सवाल कंगनाने केला. तसेच हिंदू धर्मानुसार मार्गक्रमण करणं ही एक तपस्या असल्याचंही ती म्हणाली.

अशी काय जवानी पाहिली?

दरम्यान, कंगनाने आंदोलकांना गटर जनरेशन म्हटलं आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असं रामदेव बाबांना विचारण्यात आलं होतं. त्यावर रामदेव बाबांनी कंगनावर सडकून टीका केली होती. कंगनाने तिचं बालपण पाहिलं असेल. ते काय होतं? तिने तिची जवानी पाहिली आहे काय?, असा सवाल रामदेव बाबांनी केला होता. त्यावर कंगनाने पलटवार केला. माझी जवानी पाहण्यासाठी बाबा रामदेव काय माझ्या बेडरूममध्ये वटवाघळासारखे उलटे टकलेले होते का? तुम्ही काय पाहिलं? काय पाहिलं? हे सांगितलं पाहिजे. अशा प्रकारच्या थुकरट गोष्टी करणं त्यांना शोभत नाही. माझं बालपणही इतर मुलींसारखंच गेलं. काही रिलेशनशीप होत्या. त्या सर्वांना माहीत आहे. त्यापेक्षा त्यांनी काय अशी माझी वेगळी जवानी पाहिली? त्यांनी काही मर्यादा सोडू नये, असा संताप कंगनाने व्यक्त केला.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच