AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कबुलनामा, अनुष्का शर्मा हिच्या करिअरची वाट लावायची होती, करण जोहर विरोधात संपाताची लाट, निर्मात्याने केला

बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही कायमच चर्चेत असते. अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पागहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. या व्हिडीओमध्ये करण जोहर हा अनुष्का शर्मा हिच्याबद्दल बोलताना दिसतोय.

कबुलनामा, अनुष्का शर्मा हिच्या करिअरची वाट लावायची होती, करण जोहर विरोधात संपाताची लाट, निर्मात्याने केला
| Updated on: Apr 06, 2023 | 4:48 PM
Share

मुंबई : करण जोहर याचे नाव कायमच चर्चेत असते. करण जोहर (Karan Johar) याच्यावर टिका केली जाते. नेपोटिझमचे नाव आले की, करण जोहर याचा चेहरा लोकांच्या पुढे येतो. कायमच करण जोहर हा आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून स्टारकिड्सला लाॅन्च करताना दिसतो. आतापर्यंत डझनभर स्टारकिड्स (Starkids) करण जोहर याने लाॅन्च केले आहेत. यामुळेच करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. इतकेच नाहीतर करण जोहर याने आतापर्यंत अनेक अभिनेत्यांचे आणि अभिनेत्रींचे करिअर खराब केल्याचा देखील त्याच्यावर सतत आरोप केले जातो. आता सध्या सोशल मीडियावर करण जोहर याचा एक व्हिडीओ (Video) तूफान व्हायरल होताना दिसतोय.

करण जोहर याचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामध्ये करण जोहर याने अत्यंत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. करण जोहर याचे हे बोलणे ऐकून अनेकजण हैराण झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे परत एकदा तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. अनेकांनी करण जोहर याचा हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केलाय.

करण जोहर याचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये करण जोहर हा म्हणताना दिसतोय की, आदित्य चोप्राला अनुष्का शर्मा हिला रब ने बना दी जोडीमध्ये कास्ट न करण्यास मी सांगितले होते. करणचा हा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. म्हणजेच अनुष्का शर्मा हिचे करिअर खराब करण्याचे करण जोहर याने ठरवले होते. याचा कबुलनामा थेट करण जोहर याने केला. मुळात म्हणजे हा व्हिडीओ 2016 मधील आहे.

आता करण जोहर याच्या या व्हिडीओवर विवेक अग्नीहोत्री आणि अपूर्वा असरानी यांनी प्रतिक्रिया दिलीये. विवेक अग्निहोत्री या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाले की, एखाद्याचा एकमेव छंद म्हणजे करियर बनवणे किंवा खराब करणे. जर बॉलिवूड गटारात असेल तर ते प्रतिभावान बाहेरच्या लोकांविरुद्धच्या काही घाणेरड्या बॅकरूम राजकारणामुळेच आहे…आता विवेक अग्नीहोत्री यांची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

अपूर्वा असरानी याने करण जोहर याचा तो व्हिडीओ शेअर करत म्हटले की, अनुष्का शर्माच्या करिअरचा मर्डर करायचा होता, करण जोहरने 2016 मध्ये राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांच्यासमोर याची कबुली दिली होती. मला खात्री आहे, परंतु तरीही आउटसाइडर-इनसाइडर वादात एक योग्य मुद्दा आहे…आता अनेकांनी अपूर्वा असरानी याच्या पोस्टवर कमेंट करण्यास सुरूवात केलीये.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.