AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid 19: करण जोहरची पार्टी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पार्टीतील 50-55 सेलिब्रिटींना कोरोना?

या पार्टीला हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर, सैफ अली खान यांसारखे बॉलिवूडमधील असंख्य कलाकार उपस्थित होते. यात बर्थडे पार्टीतील जवळपास 50 ते 55 सेलिब्रिटींना कोरोनाची (Covid 19) लागण झाल्याचं कळतंय.

Covid 19: करण जोहरची पार्टी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पार्टीतील 50-55 सेलिब्रिटींना कोरोना?
Karan Johar PartyImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jun 05, 2022 | 11:27 AM
Share

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) नुकताच आपला 50वा वाढदिवस साजरा केला. मुंबईतील अंधेरी (Andheri) इथल्या यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये त्याने जंगी बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर, सैफ अली खान यांसारखे बॉलिवूडमधील असंख्य कलाकार उपस्थित होते. यात बर्थडे पार्टीतील जवळपास 50 ते 55 सेलिब्रिटींना कोरोनाची (Covid 19) लागण झाल्याचं कळतंय. ‘बॉलिवूड हंगामा’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “पार्टीनंतर फिल्म इंडस्ट्रीतील करण जोहरच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना कोविडची लागण झाली आहे. काही कलाकार याबद्दलची माहिती उघड करत नाही आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनलाही कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक आर्यन ज्या अभिनेत्रीसोबत मिळून चित्रपटाचं प्रमोशन करत होता, ती अभिनेत्री करणच्या पार्टीला हजर होती”, अशी माहिती सूत्रांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिली.

याआधीही करण जोहरची पार्टी कोरोनाच्या संसर्गामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. करणने त्याच्या घरी छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींना नंतर कोरोनाची लागण झाली होती. करीना कपूर खान, अमृता अरोरा, सीमा खान, महीप कपूर यांना कोरोनाची लागण झाली होती. यावरून राजकीय नेत्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर करणला सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. ‘माझ्या घरी पार्टी नव्हती, तर फक्त आठ जण छोट्याशा गेट-टुगेदरसाठी एकत्र आले होते. आम्ही सर्वांनी कोविडच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं होतं’, असं त्याने म्हटलं होतं.

पार्टीसाठी केली होती जय्यत तयारी, पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आता पुन्हा एकदा करण जोहरच्या पार्टीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. करणने त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील दिग्गज आणि नवोदित कलाकारांना पार्टीचं आमंत्रण दिलं होतं. या कलाकारांचे पार्टीतील व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.